जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी महत्वाच्या असलेल्या बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. बांगलादेशमधील एकदिवसीय मालिकेसाठी दोन धडाडीचे खेळाडू बाहेर, तर दोन खेळाडूंची एन्ट्री झाली आहे.
भारतीय संघामागे लागलेलं दुखापतींचं ग्रहण काही सुटता सुटत नाहीय. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा या दोन स्टार खेळाडूंपाठोपाठ दीपक चहर दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे यांना वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची ( WTC) तयारी सुरू केली आहे आणि फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला बांगलादेश व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धचे सर्व कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. यामुळे त्याने माघार घेतली आहे.
जडेजासोबत चांगला फलंदाज यश दयाल याने देखील माघार घेतली आहे. ऑगस्ट महिन्यात जडेजा भारताकडून अखेरचा खेळला होता. बांगलादेश दौऱ्यासाठी त्याची संघात निवड केली गेली होती.
अशी आहे #TeamIndia: रोहित शर्मा (C), केएल राहुल (VC), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (WK), इशान किशन (WK), शाहबाज अहमद, अक्षर पटेल , पी सुंदर, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन.