04 Jul, 24 09:50 PM
वानखेडे मैदानावर विराट-रोहितने केला भन्नाट डान्स, पाठोपाठ सूर्यकुमार यादवनेही धरला ठेका
वानखेडे मैदानावर विराट-रोहितने केला भन्नाट डान्स, पाठोपाठ सूर्यकुमार यादवनेही धरला ठेका
04 Jul, 24 09:21 PM
वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचलेल्या भारतीय खेळाडूंनी केला जबरदस्त डान्स
मुंबईत पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडूंना लाखोंच्या जनसमुदायात येत ओपन डेक बसमधून विजयी मिरवणुकीत आनंद साजरा केला. त्यानंतर वानखेडे मैदानावर आजच्या जल्लोष कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा पार पडला. या टप्प्यासाठी वानखेडेवर दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी मैदानातच जबदरस्त डान्स करत उपस्थित फॅन्समध्ये ऊर्जा भरली.
---------
04 Jul, 24 08:34 PM
टीम इंडियाच्या खेळाडूंनी तिरंग्यासह केला जल्लोष
टीम इंडियाच्या खेळाडूंचा विजयरथ हळूहळू वानखेडे स्टेडियमकडे कूच करत असताना वर्ल्ड चॅम्पियन्सने तिरंगा फडकावत जल्लोष केला
04 Jul, 24 08:27 PM
विराट कोहली अन् रोहित शर्माने जल्लोष करत एकत्र उंचावली वर्ल्ड कपची ट्रॉफी!
टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत सर्वच खेळाडूंनी जल्लोष केला. त्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गजांनी एकत्रितपणे वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आणि चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला.
04 Jul, 24 08:20 PM
टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत BCCIचे जय शाह देखील जल्लोषात सहभागी
टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत BCCIचे जय शाह देखील जल्लोषात सहभागी
04 Jul, 24 08:18 PM
मुंबई पोहोचलेली टीम इंडिया मरीन ड्राइव्हला आली अन् तेथून टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली. भारतीय खेळाडूंनी ओपन डेक बसवर येऊन सर्वांचे मनापासून आभार मानले. मरीन ड्राईव्हपासून वानखेडे मैदानापर्यंत निघालेल्या रॅलीमध्ये सर्व खेळाडूंनी वर्ल्ड कप उंचावून आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, आलेल्या मोठ्या जनसमुदायाकडून अभिवादन स्वीकारले.
04 Jul, 24 08:18 PM
टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत BCCIचे जय शाह देखील जल्लोषात सहभागी
04 Jul, 24 08:17 PM
मुंबई पोहोचलेली टीम इंडिया मरीन ड्राइव्हला आली अन् तेथून टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली. भारतीय खेळाडूंनी ओपन डेक बसवर येऊन सर्वांचे मनापासून आभार मानले. मरीन ड्राईव्हपासून वानखेडे मैदानापर्यंत निघालेल्या रॅलीमध्ये सर्व खेळाडूंनी वर्ल्ड कप उंचावून आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, आलेल्या मोठ्या जनसमुदायाकडून अभिवादन स्वीकारले.
04 Jul, 24 07:16 PM
मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; CM शिंदे ॲक्शन मोडवर
मरीन ड्राईव्ह परिसरातील तोबा गर्दी पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, आयसीसी ट्वेंटी-२० विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत. विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन पॉईंट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये तसेच जमलेल्या क्रिकेट प्रेमींचीही गैरसोय होऊ नये याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, अनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दुरध्वनीद्वारे दिल्या आहेत.
04 Jul, 24 06:36 PM
टीम इंडियासाठी कडक सुरक्षा व्यवस्था
कडक सुरक्षा व्यवस्थेत भारतीय संघाचे शिलेदार मुंबईत दाखल झाले. थोड्याच वेळात परेडला सुरुवात होईल.
04 Jul, 24 06:27 PM
चाहत्यांनी मरीन ड्राईव्हकडे जाऊ नये - मुंबई पोलीस
भारतीय क्रिकेट संघाच्या विजय परेडसाठी वानखेडे स्टेडियमच्या आजूबाजूला चाहत्यांच्या प्रचंड गर्दीमुळे मुंबई पोलिसांनी चाहत्यांना मरीन ड्राईव्हकडे न जाण्यास सांगितले आहे.
04 Jul, 24 06:21 PM
मुंबईकरांचे स्पिरीट! प्रचंड गर्दीतही अँम्ब्युलन्सला करून दिली वाट
मरीन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. टीम इंडियाची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. अशातच प्रचंड गर्दीतही अँम्ब्युलन्सला वाट देऊन मुंबईकर चाहत्यांनी स्पिरीट दाखवून दिले.
04 Jul, 24 06:09 PM
टीम इंडियाच्या विमानाला 'सॅल्युट'!
भारतीय संघाला घेऊन येणाऱ्या विमानाला विमानतळावर 'वॉटर सॅल्युट' देण्यात आला. ही अनोखी घटना साऱ्यांचेच लक्ष वेधत आहे.
04 Jul, 24 05:39 PM
चाहत्यांच्या गर्दीत टीम इंडियाची बस अडकली
मरीन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांनी एकच गर्दी केल्याने टीम इंडियाची बस अडकली.
04 Jul, 24 05:00 PM
हार्दिक पांड्याचा जयघोष
आयपीएल २०२४ मध्ये चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागलेल्या हार्दिक पांड्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वानखेडे स्टेडियमवर चाहते 'हार्दिक हार्दिक' अशा घोषणा देताना दिसले.
04 Jul, 24 04:56 PM
मरीन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांची तोबा गर्दी
भारताच्या चॅम्पियन संघाला पाहण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांनी एकच गर्दी केली. पावसाच्या हलक्या सरी चाहत्यांचा उत्साह वाढवत आहेत.
04 Jul, 24 04:27 PM
वानखेडेमध्ये चाहत्यांचा जल्लोष
मुंबई क्रिकेट असोसिएशनने आजच्या खास कार्यक्रमासाठी सर्व चाहत्यांना वानखेडे स्टेडियममध्ये मोफत एन्ट्री देण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या सरी बरसत असल्या तरी चॅम्पियन संघाची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी क्रिकेटच्या पंढरीत मोठ्या संख्येने हजेरी लावली.
04 Jul, 24 03:32 PM
वानखेडे स्टेडियममध्ये चाहत्यांना मोफत प्रवेश मिळणार
मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियमवर चॅम्पियनचे स्वागत करण्यासाठी चाहत्यांना मोफत प्रवेश देण्याची घोषणा केली आहे. भारतीय संघ संध्याकाळी ७ वाजता वानखेडे स्टेडियमवर पोहोचेल. स्टेडियमचे दरवाजे दुपारी ४ वाजता चाहत्यांसाठी उघडतील.
04 Jul, 24 01:55 PM
टीम इंडिया दिल्ली विमानतळावर पोहोचली
भारतीय संघ मुंबईला जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर पोहोचला आहे. २ वाजता फ्लाईट पकडल्यानंतर खेळाडू ४ वाजेपर्यंत मुंबईत पोहोचतील आणि ५ वाजता रोड शो होणार आहे, याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
04 Jul, 24 01:21 PM
टीम इंडियाने पंतप्रधान मोदींची घेतली भेट; व्हिडीओ आला समोर
भारतीय क्रिकेट संघाने 7, लोककल्याण मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 29 जून रोजी बार्बाडोस येथे T20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचली.
04 Jul, 24 12:55 PM
पंतप्रधान मोदींसोबतची बैठक संपली, आता टीम इंडिया विजय परेडसाठी मुंबईला रवाना होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ 7 लोककल्याण मार्गावरून रवाना झाली. 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये T20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचली.
04 Jul, 24 11:39 AM
टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया
बार्बाडोसहून टीम इंडिया परतल्यावर केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, टी-20 विश्वचषक विजेता आपला भारतीय संघ, ज्यांनी तिरंगा फडकवला. त्यांचे मनापासून स्वागत. संपूर्ण देश तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे.
04 Jul, 24 11:14 AM
आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकणे ही मोठी उपलब्धी; राजीव शुक्ला
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की , प्रत्येकजण आनंदी आहे कारण दक्षिण आफ्रिका आणि अनेक देशांना हरवून आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकणे ही मोठी उपलब्धी आहे. याचे श्रेय मी सर्व खेळाडू, संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना देईन. एअर इंडियाच्या खासगी चार्टर्ड विमानाने टीम इंडिया आज परतली असून आजच मुंबईला रवाना होणार आहे.
04 Jul, 24 10:40 AM
रोहित शर्माने केक कापून सेलिब्रेशन केले
कर्मधार रोहित शर्माने ITC मौर्या हॉटेलमध्ये केक कापून सेलिब्रेशन केले. त्यानंतर भारतीय संघ पंतप्रधानांच्या निवासस्थानी रवाना झाला.
04 Jul, 24 10:47 AM
पीएम मोदींची भेट घेण्यासाठी टीम इंडिया रवाना
दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी रवाना झाली आहे.
T20 विश्वचषक ट्रॉफीसह टीम इंडियाचे दुसरे T20I विजेतेपद जिंकल्यानंतर आज सकाळी दिल्ली विमानतळावर आगमन झाले.
04 Jul, 24 10:40 AM
ढोलाच्या तालावर सूर्यकुमारचा भांगडा
क्रिकेटप्रेमींनी त्यांच्या टीम इंडियाचे विमानतळ आणि हॉटेलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी ढोल वाजवताना पाहिल्यावर ते स्वतःला रोखू शकले नाहीत. या दोघांसोबत इतर वादकही ढोलाच्या तालावर नाचताना दिसले. सूर्यकुमार यादव यांनी मनमोकळे नृत्य केले. त्यांचा डान्स पाहून सगळेच थक्क झाले.
04 Jul, 24 10:38 AM
मुंबईत टीम इंडियाची T20 विश्वचषक विजय परेड
भारतीय संघ सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. भारतीय संघ पंतप्रधानांसोबत नाश्ता करणार आहे. यानंतर संघ मुंबईला रवाना होईल. टीम इंडियाची विजयी परेड एनसीपीए नरिमन पॉइंट ते मुंबईतील वानखेडे स्टेडियमपर्यंत काढण्यात येणार आहे.
04 Jul, 24 10:37 AM
लवकरच पंतप्रधानांशी भेट होणार
बार्बाडोसहून थेट दिल्लीत दाखल झालेली टीम इंडिया काही वेळात पंतप्रधान मोदींना भेटणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ लवकरच हॉटेलमधून पंतप्रधानांच्या निवासस्थानासाठी रवाना होणार आहे.
04 Jul, 24 10:36 AM
चॅम्पियन्सची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते आतुर
भारतीय संघाच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. आपल्या आवडत्या स्टार्सची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते.
04 Jul, 24 10:36 AM
विश्वचषक ट्रॉफी सारखाच बनवला केक
भारतीय संघ विमानतळावरून ITC मौर्या हॉटेलमध्ये जाणार गेला. भारतीय स्टार्सच्या स्वागतासाठी हॉटेलमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वर्ल्ड कप ट्रॉफीच्या स्टाईलमध्ये केक बनवण्यात आला आहे.
04 Jul, 24 10:34 AM
२९ जून रोजी T20 विश्वचषक जिंकला
२९ जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने T20 विश्वचषक जिंकला होता. भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 विश्वचषकाच्या ट्रॉफीचा एक अद्भुत योगायोग आहे. भारताने प्रथमच दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली आणि दुसऱ्यांदा पराभव करून विजय मिळवला.
04 Jul, 24 10:34 AM
बार्बाडोसमधील वादळामुळे भारतीय संघाला ३ दिवस थांबावे लागले
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्याच दिवशी मायदेशी परतणार होता, पण वादळाने अडचणी आल्या. बार्बाडोसमधील वादळामुळे भारतीय संघ जवळपास ३ दिवस तिथल्या एका हॉटेलमध्ये होता. यानंतर विशेष चार्टर विमानाने संघाच्या परतीची व्यवस्था करण्यात आली.
04 Jul, 24 10:32 AM
T20 विश्वचषक ट्रॉफी १७ वर्षांनंतर भारतात परतली
T20 विश्वचषक ट्रॉफी १७ वर्षांनंतर भारतात परतली आहे. भारताने यापूर्वी २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली या फॉरमॅटचा विश्वचषक जिंकला होता. यानंतर भारताला T20 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली.
04 Jul, 24 10:31 AM
वर्ल्ड कप ट्रॉफीसह टीम इंडिया मायदेशी पोहोचली
T20 विश्वचषक जिंकून भारतीय क्रिकेट संघ मायदेशी परतला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन गुरुवारी सकाळी नवी दिल्लीत पोहोचले.