Join us  

टीम इंडिया दिल्लीत पोहोचली, कोहली-रोहितची पहिली झलक; विमानतळापासून हॉटेलपर्यंत चाहत्यांचा जल्लोष

Team India Arrives Delhi : भारतीय क्रिकेट टीम दिल्लीत पोहोचली आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीमचे पहिल्यांदाच देशात आगमन झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 8:41 AM

Open in App

Team India Arrives Delhi :  भारतीय क्रिकेट संघानेरोहित शर्माच्या नेतृत्वात शनिवारी दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक पटकावला. यानंतर भारतीय संघ सोमवारी सकाळपर्यंत मायदेशी परतणे अपेक्षित होते, परंतु बार्बाडोसला चक्रिवादळाचा तडाखा बसल्याने संघ तिथेच अडकला आहे. आज गुरुवारी पहाटे टीम इंडिया मायदेशात परतली आहे.

टीम इंडिया दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर पोहोचली, टीम इंडियासाठी खास बसची व्यवस्था करण्यात आली होती. येथून भारतीय संघ आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये पोहोचला. भारतीय संघाची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी दिल्ली विमानतळावर गर्दी केली होती. टीम इंडिया विमानतळाबाहेर येताच चाहते इंडिया-इंडियाच्या घोषणा देत होते.

Champions Trophy 2025 : लाहोरमध्ये होणार IND vs PAK महामुकाबला; सामन्याची तारीख ठरली?

बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह संघातील अनेक खेळाडू ट्रॉफीसोबत दिसत आहेत. बार्बाडोसमध्ये २०२४ च्या T20 कप फायनलमध्ये भारतीय संघाने २९ जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. नियोजित वेळापत्रकानुसार भारतीय क्रिकेट संघाचे विमान ४ जुलै रोजी सकाळी ६ वाजता दिल्लीला पोहोचले.

चाहत्यांची गर्दी

भारतीय क्रिकेट संघ दिल्लीत पोहोचला तेव्हा चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. चॅम्पियन खेळाडूंना पाहता यावे यासाठी अनेक चाहते रात्री उशिरा विमानतळावर पोहोचले होते.

भारतीय क्रिकेट संघ विमानतळावरून ITC मौर्या हॉटेलमध्ये पोहोचल्यावर खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे, यात लिहिले की, वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाच्या जल्लोषात सामील व्हा. 'आमच्यासोबत सेलिब्रेट करण्यासाठी ४ जुलै रोजी सायंकाळी ५:०० वाजता मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर पोहोचा, तारीख लक्षात ठेवा, असंही या पोस्टमध्ये लिहिले आहे.

कर्णधार रोहित शर्मा यानेही या विजय परेडबाबत भावनिक आवाहन केले. रोहितने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आम्ही तुम्हा सर्वांसोबत या खास क्षणाचा आनंद घेऊ इच्छितो. चला तर मग ४ जुलै रोजी सायंकाळी ५:०० वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे येथे विजय परेड करून हा विजय साजरा करूया.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयरोहित शर्माविराट कोहलीऑफ द फिल्ड