भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल दुखापतीमुळे सध्या संघातून बाहेर आहे. अनफिट असल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो खेळू शकणार नाही. एवढंच नाही तर त्याच्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याबाबतही संशय आहे. जर तो अनफिट राहिला तर त्याचं स्थान कोण घेणार, हा प्रश्नही क्रिकेटप्रेमींच्या मनात घोळत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अक्षर पटेल खेळू शकणार नसल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मात्र यावर्षी भारतातच होत असलेल्या वर्ल्डकपपूर्वी अक्षर पटेलला दुखापतीतून सावरण्याची वेळ दिली जाईल. अक्षर पटेलला ही दुखापत आशिया चषक स्पर्धेदरम्यान झाली होती.
वर्ल्डकपपूर्वी स्वत:चा फिटनेस सिद्ध करण्याची अक्षर पटेलकडे ही चांगली संधी होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो खेळला असता तर त्याच्या फिटनेसचं परिक्षण झालं असतं. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना २७ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे.
दरम्यान, रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. तसेच अक्षर पटेलला पर्यायी खेळाडू म्हणून संघ व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास दर्शवू शकते. बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले की, संघव्यवस्थापन अक्षर पटेलला दुखापतीतून सावरण्याची पूर्ण संधी देऊ इच्छिते. त्याच्या बोटाला झालेली दुखापत बरी झाली आहे. तसेच पुढच्या काही दिवसांमध्ये तो विश्वचषक स्पर्धेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकतो. या आयसीसी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा पहिला सामना हा ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्यामुळे अजून काही वेळ आहे. आता अश्विनचा विचार केल्यास तो मॅच फिट आहे. तसेच चांगल्या फॉर्ममध्येही आहे. जर अक्षर पटेल वेळीच फिट झाला नाही तर अश्विनला त्याच्या जागी संघात घेतलं जाईल.
Web Title: Team India: Axar Patel unfit, who will replace him in the World Cup? The name is coming up
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.