भारतीय संघाचा स्टार खेळाडू सर्फराज खानच्या घरी नव्या पाहुण्या आगमन झाले. दोन दिवसांपूर्वी शतकी खेळी करणारा सर्फराज बाप झाला आहे. त्याची पत्नी रोमाना हिने एका मुलाला जन्म दिला. चिवट खेळीसाठी प्रसिद्ध असलेला सर्फराज बंगळुरू कसोटीत भारतासाठी एकटा लढला होता. त्या सामन्यात त्याने १५० धावांची शतकी खेळी केली होती. सर्फराजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरुन आपल्या लेकाची पहिली झलक शेअर केली आहे. यामध्ये त्याचे वडील नौशाद खानदेखील दिसत आहेत.
मुंबईचा क्रिकेटपटू सर्फराज खानने (Sarfaraz Khan) काश्मीरमधील रोमाना जहूरशी (Romana) लग्न केले आहे. काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील पेशपोरा गावात त्यांचा विवाह झाला. सर्फराजची पत्नी रोमाना जहूरने दिल्लीतून एमएससीचे शिक्षण घेतले होते. सर्फराजची बहीणही दिल्लीत रोमाना ज्या कॉलेजमध्ये शिकली होती त्याच कॉलेजमध्ये शिकली होती. दोघांमध्ये चांगली मैत्री होती आणि बहिणीमुळेच सर्फराज खान आणि रोमाना यांची पहिली भेट झाली होती.
सर्फराज लढला पण भारत हरलादरम्यान, बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव केला. सामन्याच्या पाचव्या दिवशी किवी संघाला विजयासाठी अवघ्या १०७ धावा करायच्या होत्या. मग न्यूझीलंडने दोन गडी गमावून हे लक्ष्य गाठले. शेवटच्या दिवशी रचिन रवींद्र आणि विल यंग यांच्यातील ७२ धावांच्या भागीदारीने टीम इंडियाचा पराभव निश्चित केला. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताकडून बळी घेणारा एकमेव गोलंदाज जसप्रीत बुमराह ठरला, त्याने २ फलंदाजांना बाद केले. न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने पहिल्या डावात अवघ्या ४६ धावा केल्या. पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या ४६ धावांत गडगडली. मग न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात ४०२ धावा करुन यजमानांची कोंडी केली. दुसऱ्या डावात भारताने सर्वबाद ४६२ धावा केल्याने टीम इंडियाला १०६ धावांची आघाडी मिळाली. मोठी आघाडी न मिळाल्याने भारतीय गोलंदाजांना लढण्याची संधीच मिळाली नाही.