टीम इंडियाची होणार २१ नोव्हेंबरला घोषणा; 'या' खेळाडूची होऊ शकते एंट्री...

या संघात एका नव्या खेळाडूला एंट्री मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 06:49 PM2019-11-19T18:49:13+5:302019-11-19T18:49:42+5:30

whatsapp join usJoin us
Team India to be announced on November 21; 'This' player may have entry ... | टीम इंडियाची होणार २१ नोव्हेंबरला घोषणा; 'या' खेळाडूची होऊ शकते एंट्री...

टीम इंडियाची होणार २१ नोव्हेंबरला घोषणा; 'या' खेळाडूची होऊ शकते एंट्री...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : बांगलादेशविरुद्धच्या डे नाइट कसोटी सामन्यानंतर भारताचा संघ वेस्ट इंडिजबरोबर ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी भारतीय संघाची निवड २१ नोव्हेंबरला होणार आहे. या संघात एका नव्या खेळाडूला एंट्री मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

Image result for indian test team with mayank

बांगलादेशिरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तर मयांकने द्विशतकासह दमदार फलंदाजीचा नमुना पेश केला होता. आता त्याला ताही दिवसांतच गूड न्यूज मिळणार असल्याचे कळत आहे. भारताने इंदूर येथे झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवला. भारताने बांगलादेशला तब्बल एक डाव आणि १३० धावांनी पराभूत केले.

Image result for indian test team with mayank

या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मयांकने फक्त द्विशतक झळकावले नाही, तर त्याची खेळी चांगलीच आक्रमकही होती. द्विशतक झळकावताना मयांकने षटकार लगावला होता. त्यावेळी काही जणांना वीरेंद्र सेहवागचीही आठवण आली. त्यामुळे आता सेहसागसारखीच भूमिका मयांकला मिळू शकते, असे म्हटले जात आहे.
बांगलादेश मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ भारतात तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 मालिका खेळण्यासाठी येणार आहे. या मालिकेत रोहितला विश्रांती दिली जाऊ शकते. टीम इंडियाचा मर्यादित षटकांच्या संघाचा उप कर्णधार रोहित गेले वर्षभर सातत्यानं खेळत आहे. त्यात इंडियन प्रीमिअर लीगमधील 16 सामन्यांसह 60 हून अधिक सामन्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्याच्यावरील कामाचा ताण लक्षात घेता, त्यालाही विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे रोहितला विश्रांती दिल्यावर मयांकची एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-20 संघात वर्णी लागू शकते, असे म्हटले जात आहे.

विंडीज मालिकेचे वेळापत्रक
⦁    ट्वेंटी-20 मालिका
6 डिसेंबर - मुंबई
8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम
11 डिसेंबर - हैदराबाद
⦁    वन डे मालिका
15 डिसेंबर- चेन्नई
18 डिसेंबर- विशाखापट्टणम
22 डिसेंबर - कट्टक
 

Web Title: Team India to be announced on November 21; 'This' player may have entry ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.