नवी दिल्ली : आयपीएलचे आयोजन अनिश्चित काळासाठी स्थगित झाले शिवाय अनेक मालिका आयोजनावर संकट उभे असले तरी २०२१ मध्ये मात्र विराट कोहलीच्या संघाला जवळपास १५ कसोटी सामने खेळावे लागणार आहेत. २०२० मध्ये भारताने केवळ पाच कसोटी सामने खेळले.याशिवाय यंदा भारताने सहा एकदिवसीय आणि आठ टी-२० सामने खेळले आहेत. आॅक्टोबरमध्ये आॅस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचे आयोजन झाल्यास आणखी काही सामने खेळावे लागू शकतात. त्याआधी श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर जायचे आहे. सप्ेंटबर महिन्यात वनडे आशिया चषकाचे आयोजन होणार असून पाठोपाठ इंग्लंड संघ तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळण्यासाठी भारतात येणार आहे.
आॅक्टोबरमध्ये वनडे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी द. आफ्रिका संघ भारतात दाखल होईल. पाठोपाठ भारतात टी-२० विश्वचषकाचेदेखील आयोजन होणार आहे. नोव्हेबरमध्ये न्यूझीलंड संघ भारत दौºयावर येईल तर डिसेंबरमध्ये भारताला तीन कसोटी आणि तीन टी-२० सामने खेळण्यासाठी द. आफ्रिका दौºयावर जायचे आहे. (वृत्तसंस्था)२०२१च्या सुरुवातीला इंग्लंड संघ भारतात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येणार आहे. यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध तीन वनडेचे आयोजन होईल. पाठोपाठ दीड महिन्यांचा कालावधी आयपीएलमध्ये जाणार आहे.जूनमध्ये विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला भारत फायनलमध्ये पोहोचण्याची दाट शक्यता आहे. यानंतर श्रीलंकेत तीन टी-२० सामन्यांचे आयोजन होताच आॅगस्ट महिन्यात भारतीय संघ पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंड दौºयावर रवाना होईल.