भारतीय संघाचा वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन रोहित शर्मा आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. पत्रकार परिषदेतील तो अनेकदा आपल्या हटके अंदाजीतील 'बोलंदाजी'नं लक्षवेधून घेतो. आता रोहित शर्मानं बॅट निवडीची गोष्ट शेअर केलीये. यातही हिटमॅनचा अंदाज इतर सहकाऱ्यांपेक्षा वेगळा असल्याचे दिसून येते.
बॅट निवडताना रिहित एक गोष्ट प्रामुख्यानं बघतो, इतर गोष्टी त्याच्यासाठी फार मॅटर करत नाहीत
क्रिकेटच्या मैदानात उत्तुंग फटकेबाजीमुळं हिटमॅन नावाने ओळखला जाणारा रोहित बॅटिंग करण्यासाठी मैदानात येताना बॅट निवडताना फार विचार करत नाही. ही गोष्ट खुद्द रोहितनेच शेअर केली आहे. बॅट निवडताना ती संतुलित आहे याची खात्री करतो. याशिवाय माझ्यासाठी इतर गोष्टी मॅटर करत नाहीत, असे तो म्हणाला आहे. ड्रेसिंग रूममधील बॅट सिलेक्शनची गोष्ट शेअर करताना त्याने बहुतांश खेळाडू बॅट निवडताना 'बारीक सारीक गोष्टी'वर फोकस करतात, हा किस्साही शेअर केला.
इतर खेळाडू बॅट निवडताना काय काय पाहतात?
सीएट क्रिकेट रेटिंग अवार्ड्स कार्यक्रमात रोहित शर्माला बॅट सिलेक्शनसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रोहित म्हणाला की, बॅट सिलेक्शनवेळी मी फार विचार करत नाही. संघात मी एकमेव असेन जे या गोष्टीसाठी कमी महत्त्व देतो. ज्यांनी माझ्यासोबत ड्रेसिंग रुम शेअर केली आहे त्यांना ही गोष्ट चांगलीच माहिती आहे. मी बॅटवर स्टिकर आणि टॅप लावतो. जी बॅट निवडतो ती घेऊनच खेळायला जातो. मी असे बरेच खेळाडू पाहिले आहेत, जे बॅट निवडताना वेगवेगळ्या गोष्टी तपासण्याला महत्त्व देतात. अनेकजण बॅटचं वजन किती आहे? आउटर साइडनं बॅट कशी दिसते? यासारख्या बाबी पाहून बॅटची निवड करतात. पण मी बॅट निवडताना एवढ्या गोष्टी पाहत बसत नाही, असे त्याने म्हटले आहे.
क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्काराने सन्मानित झाला रोहित
सीएट क्रिकेट रेटिंग अवार्ड्स वेळी रोहित शर्माला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोहित शर्मानं २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८०० धावा काढल्या आहेत. यात वनडेत १२५५ धावांचा समावेश आहे. त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०२४ मधील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून आयसीसी स्पर्धेतील दुष्काळ संपुष्टात आणला होता.