Rohit Sharma: बुमराह नाही, आता हा गोलंदाज बनलाय कर्णधार रोहितचा सर्वात फेव्हरिट, वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळणं निश्चित!

खरे तर हा वेगवान गोलंदाज आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी जसप्रीत बुमराहपेक्षाही अधिक विश्वासू आणि जवळचा बनला आहे. हा वेगवान गोलंदाज एवढा घातक आहे की, तो गोलंदाजीस आला, की विरोधी संघातील फलंदाजांना धडकी भरते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:59 PM2023-01-17T23:59:16+5:302023-01-18T00:01:14+5:30

whatsapp join usJoin us
team india captain rohit sharma praised mohammed siraj in press confrence | Rohit Sharma: बुमराह नाही, आता हा गोलंदाज बनलाय कर्णधार रोहितचा सर्वात फेव्हरिट, वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळणं निश्चित!

Rohit Sharma: बुमराह नाही, आता हा गोलंदाज बनलाय कर्णधार रोहितचा सर्वात फेव्हरिट, वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळणं निश्चित!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडियाचा एक वेगवान गोलंदाज आता जसप्रीत बुमराहसाठी मोठा धोका बनताना दिसत आहे. खरे तर हा वेगवान गोलंदाज आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी जसप्रीत बुमराहपेक्षाही अधिक विश्वासू आणि जवळचा बनला आहे. हा वेगवान गोलंदाज एवढा घातक आहे की, तो गोलंदाजीस आला, की विरोधी संघातील फलंदाजांना धडकी भरते. या गोलंदाजाचे नाव आहे, मोहम्मद सिराज. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविडही मोहम्मद सिराजच्या कामगिरीवर अत्यंत खूश आहेत आणि आता  हा वेगवान गोलंदाज 2023 च्या वर्ल्ड कपमध्येही खेलताना दिसेल.

आता हा गोलंदाज बनलाय रोहितचा सर्वात फेव्हरिट -
न्यूझीलंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आपला सर्वात विश्वासू आणि जवळच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे कौतुक केले आहे. रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला, 'मोहम्मद सिराजने गेल्या दोन वर्षांत सर्वच प्रकारांत क्रिकेटमध्ये सुधारणा केली आहे. तो आमच्यासाठी एक महत्वाचा खेळाडू आहे. गेल्या दोन वर्षांत त्याने आपली लाईन आणि लेंथमध्ये चांगली सुधारणा केली आहे. आता आम्ही त्याचे आऊटस्विंगदेखील पाहत आहोत. तो स्विंगसाठी ओळखला जात नाही. पण त्याने श्रीलंकेविरुद्ध तसे केले. जर तो नव्या बॉलसह हे सतत्याने करू शकत असेल, तर ते संघासाठी तत्यंत चांगले आहे.'

2023 वर्ल्ड खेळणे निश्चित! -
रोहित म्हणाला, ‘त्याला त्याची गोलंदाजी आता चांगली समजत आहे. माझ्या दृष्टीनेही महत्वाची गोष्ट आहे. तसेच संघाला त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत हेही त्याला माहीत आहे. एकूणच तो आमच्यासाठी एक चांगला गोलंदाज झाला आहे. आम्हाला त्याला मॅनेज करणे, तसेच वर्ल्ड कप सोबतच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील टेस्टसाठी फ्रेश ठेवणे आवश्यक आहे.' रोहित म्हणाला, न्यूझिलंड भारतीय संघासाठी मोठे आव्हान बनू शकते. ही एक चांगली संधी आणि जबरदस्त विरोधी संघ आहे. ते पाकिस्तानातून एक चांगली मालिका जिंगून येत आहेत.

महत्वाचे म्हणजे, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि उमरान मलिक ही श्रीलंकेविरुद्ध भारताची एक जबरदस्त तिकडी होती.

Web Title: team india captain rohit sharma praised mohammed siraj in press confrence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.