Rohit Sharma Twitter Account Hacked : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार व धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा हा सध्या तुफान चर्चेत आहे. रोहितला अलीकडेच तिनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. रोहित कर्णधार झाल्यापासून भारताने तीन टी२० मालिका आणि एक वन डे मालिका प्रतिस्पर्ध्यांना व्हाईटवॉश देत जिंकल्या. आता तो प्रथमच कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो संघाचे नेतृत्व करेल. पण त्याच दरम्यान एका विचित्र गोष्टीमुळे रोहितचं ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याचा संशय चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. रोहित शर्माच्या अकाऊंटवरून काही ट्वीट्स सकाळपासून केली जात आहेत. त्यावरून हा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पाहा ती ३ ट्वीट्स-
--
--
--
रोहित शर्मा याच्या ट्विटर अकाऊंटवरून मंगळवारच्या (१ मार्च) दिवसात सकाळपासून ३ ट्वीट्स करण्यात आली आहेत. पण विशेष बाब म्हणजे, ही सर्व ट्वीट्स फारच विचित्र आणि असंबंध असल्याचं दिसून येत आहे. रोहितच्या या ३ ट्वीट्सच्या तपशीलाचा एकमेकांशीही फारसा संबंध नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे रोहितचं नक्की काय चाललंय... असा प्रश्न चाहत्यांना पडलेला असून त्याचं अकाऊंट हॅक झाल्याचा दाट संशय चाहत्यांना आहे.
रोहित शर्मा हा ट्विटरवर फारस अँक्टीव्ह नसतो. काही खास कारण असेल तरच तो ट्वीट्स करताना दिसतो. पण आतापर्यंत त्याच्या अकाऊंटवर करण्यात आलेली तीन ट्वीट्स यांचा नक्की अर्थ काय हे कोणालाच समजू शकलेलं नाहीये. त्यामुळे चाहत्यांना असा संशय आहे की रोहितचं ट्वीटर अकाऊंट हॅक झालं आहे. परंतु, BCCI किंवा रोहित शर्मा यांच्यापैकी कोणीही अद्याप यासंबंधी काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
रोहित शर्मा आणि भारतीय संघ सध्या मोहालीमध्ये आहे. ४ तारखेपासून येथेच भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. हा सामना विराटचा १००वा कसोटी सामना असणार आहे. तसेच रोहितचा कसोटी कर्णधार म्हणूनही हा पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचे विशेष लक्ष असणार आहे.