Team India Captain Rohit Sharma : तिन्ही फॉर्मेटमध्ये रोहित शर्माशिवाय कोणताही पर्याय नाही, माजी सिलेक्टरचं मोठं वक्तव्य

दुखापतीतून बाहेर आल्यानंतर रोहित शर्मा संघात पुनरागमन करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 10:06 PM2022-01-28T22:06:06+5:302022-01-28T22:07:01+5:30

whatsapp join usJoin us
Team India Captain There is no alternative but Rohit Sharma in all three formats of cricket said former selector saba karim | Team India Captain Rohit Sharma : तिन्ही फॉर्मेटमध्ये रोहित शर्माशिवाय कोणताही पर्याय नाही, माजी सिलेक्टरचं मोठं वक्तव्य

Team India Captain Rohit Sharma : तिन्ही फॉर्मेटमध्ये रोहित शर्माशिवाय कोणताही पर्याय नाही, माजी सिलेक्टरचं मोठं वक्तव्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडियाचा प्लेअर विराट कोहली (Virat kohli) यानं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या मालिकेत तो संघाचं नेतृत्व करेल. तर दुसरीकडे विराट कोहलीनं कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर रोहित शर्माकडेच तिन्ही फॉर्मेटचं कर्णधारपद सोपवलं जाईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

या सर्वावर अनेक दिग्गजांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. याचदरम्यान बीसीसीआयचे माजी सिलेक्टर सबा करीम यांनीदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे. सद्यस्थितीत तिन्ही फॉर्मेटचं नेतृत्व सोपवलं जावं असा रोहित शर्मा याच्याव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय नसल्याचं त्यांनी नमूद केलं. 

२०२३ हे वर्ष महत्त्वाचं
जर रोहित शर्मला तिन्ही फॉर्मेटचं कर्णधार बनवलं गेलं तर ते काही कालावधीसाठीच असेल. भारतीय संघासाठी २०२३ हे वर्ष महत्त्वाचं आहे. याच वर्षी विश्वचषक आणि आयसीसी टेस्ट चॅम्पिअमशिपचा अंतिम सामनाही होणआर आहे. अशातच नियामक मंडळाला या दोन्ही टुर्नामेंट्सवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे, असं ते म्हणाले.
बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटला जो तिन्ही फॉर्मेट खेळू शकेल असा प्लेअर तयार करण्याची आवश्यकता आहे. सध्या रोहित शर्मा हा एकमेव पर्याय आहे. एल राहुल और ऋषभ पंत सारख्या खेळाडूंना आतापर्यंत कोणी असं तयार केलेलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

मोठा निर्णय घेण्यापूर्वी सल्ला घ्यावा
"तिन्ही फॉर्मेटच्या कर्णधारपदाबाबत सोडाच, पण रोहितचं तिन्ही फॉर्मेट खेळणं हेदेखील एक आव्हान आहे. त्याला सातत्यानं दुखापत होत असते. मला वाटतं की कोणाताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी ट्रेनर, फिजिओ आणि अन्य टीम मॅनेजमेंटकडून सल्ला घेतला पाहिजे. जो कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच दुखापतग्रस्त होईल, असा आमच्याकडे असा कोणता कर्णधार असू शकत नाही," असंही सबा करीम म्हणाले.

Web Title: Team India Captain There is no alternative but Rohit Sharma in all three formats of cricket said former selector saba karim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.