कोरोना लसीकरणाचा दुसऱ्या टप्प्याला सोमवारी सुरूवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबरोबरच देशभरातील लाखो ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त अशा लाखो लोकांनी विविध रुग्णालये व केंद्रात जाऊन लस घेतली. मंगळवारी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Team India coach Ravi Shastri ) यांनीही कोरोना लस घेतली. विराट कोहलीनं रचला इतिहास; सचिन तेंडुलकरलाच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सोडलं मागे
१ मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या (corona vaccination) दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले होते. रवी शास्त्री यांनी मंगळवारी ही लस घेतली आणि त्यांनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.
त्यांनी लिहिलं की,''आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. या व्हायरसशी लढण्यात भारतातील वैद्यकिय कर्मचारी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले, त्यानं जगभरात देशाची मान आणखी उंचावली गेली. या सर्वांचे आभार मानतो.''
कोणाला लस मिळणार, किती रुपये द्यावे लागणार?
कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा राबविला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, या टप्प्यात 27 कोटी नागरिकांचे लसीकरण केले जाईल. जवळापास 12 हजार सरकारी रुग्णालयात कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच खासगी दवाखान्यात ही लस घ्यायची असेल तर, एका लसीसाठी 250 रुपये द्यावे लागतील.
तुमच्या सोयीनुसार लस घेता येणार
सीरम इन्टिट्यूचची कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोनच लसी भारतात उपलब्ध आहेत. लसीकरणावेळी जी लस उपलब्ध असेल ती लस घ्यावी लागेल. आपल्या सोयीनुसार लस घेण्याची सुविधा सध्यातरी नाही. तसेच, लस घेण्यासाठीची वेळ आणि ठिकाण म्हटलं तर ते निवडण्याचा पर्याय लसीकरणाची नोंदणी करतानाच उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
Read in English
Web Title: Team India coach Ravi Shastri got the first dose of COVID-19 vaccine
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.