ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर एक दिवसही टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहायचे नाही; रवी शास्त्री यांनी स्पष्ट केली भूमिका 

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयनं अखेर अर्ज मागवले. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर संपुष्टात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 11:19 AM2021-09-16T11:19:56+5:302021-09-16T11:21:21+5:30

whatsapp join usJoin us
Team India Coach: Ravi Shastri refuses extension, to step down after World Cup, BCCI to invite application for new coach | ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर एक दिवसही टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहायचे नाही; रवी शास्त्री यांनी स्पष्ट केली भूमिका 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर एक दिवसही टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहायचे नाही; रवी शास्त्री यांनी स्पष्ट केली भूमिका 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयनं अखेर अर्ज मागवले. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर संपुष्टात येत आहे. पण, बीसीसीआयनं शास्त्री यांना एक महिन्याचा कार्यकाळ वाढून देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र शास्त्री गुरुजींनी स्पष्ट नकार दिला, असे वृत्त  InsideSport ने दिले आहे. दरम्यान, याबाबत बीसीसीआय किंवा शास्त्री यांच्याकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शास्त्री यांना एक महिन्याचा वाढीव कालावधी देण्याची तयारी दर्शवली होती. म्हणजे टीम इंडियाच्या डिसेंबर महिन्यातील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शास्त्रींना जाण्यास सांगितले होते. पण, त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला. त्यांच्यानंतर राहुल द्रविड ही जबाबदारी घेईल का, याबाबतही संभ्रमाचे वातावरण आहे. ( Team India Coach – Ravi Shastri refuses extension)

CSKचा प्रमुख शिलेदार CPL २०२१ जेतेपद जिंकून दुबईत दाखल, किरॉन पोलार्डच्या विक्रमाशी बरोबरी 

भारताचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्यानंतर २०१७मध्ये रवी शास्त्री यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि २०१९मध्ये त्यांची फेरनियुक्ती झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांना त्यांच्याच घरच्या मैदानावर आणि इंग्लंडला मायदेशात नमवले. पण, आयसीसीच्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळे बीसीसीआय नाराज होते. कर्णधार विराट कोहली याच्यासोबतचे चांगले संबध व पाठींबा असूनही शास्त्री करार वाढवण्यास तयार नाहीत.  

राहुल द्रविड बनणार टीम इंडियाचा कोच?; सौरव गांगुलीच्या विधानानं 'द वॉल' चे चाहते आनंदात

शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविड हा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होईल, अशा चर्चा रंगल्या होत्या, परंतु भारताच्या माजी कर्णधारानं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी कायम राहणार असल्याची, भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. बीसीसीआय साहाय्यक प्रशिक्षकांच्या करारात वाढ करणार नसल्याचेही वृत्त समोर येत आहे.  त्यामुळे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनाही पद सोडावे लागेल. विराट, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या खराब कामगिरीनंतर राठोड यांचे पद धोक्यात होतेच.

महेंद्रसिंग धोनी संपवणार ८ वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ; सौरव गांगुलीनं सांगितली 'राज' की बात!

राहुल द्रविड पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक होण्यास तयार नसला तरी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याच्याकडे तात्पुरती जबाबदारी सोपवली जाऊ शकते. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी तसे संकेतही दिले आहेत.
 

Web Title: Team India Coach: Ravi Shastri refuses extension, to step down after World Cup, BCCI to invite application for new coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.