भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. यातच स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूरही लग्नबंधनात अडकणार आहे. यातच आता टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूने एंगेजमेंट उरकून घेतली आहे. या भारतीय खेळाडूने बिहारमधील एका मुलीची लाइफ पार्टनर म्हणून निवड करत अचानकपणे साखरपुडा उरकत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
टीम इंडियाच्या या क्रिकेटरनं उरकला साखरपुडा - मुकेश कुमारने छपराच्या दिव्या सिंगची लाइफ पार्टनर म्हणून निवड केली आहे. शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) रात्री गोपालगंजमधील एका हॉटेलमध्ये या दोघांची एंगेजमेंटही पार पडली. दिव्या सिंह ही भारतीय क्रिकेटर मुकेशची जवळची मैत्रीण मानली जाते. या दोघांच्या एंगेजमेंटचे काही फोटोही सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.
बिहारच्या गोपालगंजमध्ये जन्मलेल्या मुकेश कुमारचे (Mukesh Kumar) जीवन अत्यंत संघर्षमय होते. मात्र यावेळच्या आयपीएलमध्ये त्याचे नशीब असे काही चमकले, की तो करोडपती बनला आहे. कोची येथे झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याला 5.50 कोटी रुपयांत खरेदी केले आहे. त्याची बस प्राइस 20 लाख रुपये होती. मात्र तो त्याच्या मूळ किमतीच्या तुलनेत जवळपास 28 पट अधिक किंमतीला विकला गेला.
टीम इंडियात डेब्यू सामन्याची प्रतीक्षा - मुकेश कुमारने (Mukesh Kumar) टीम इंडियाकडून अद्याप एकही सामना खेळलेला नाही. नुकत्याच झालेल्या श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 संघात त्याचा समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही. मुकेश कुमारचाही भारतीय कसोटी संघातही निवड झाली आहे, पण त्याला अद्याप कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी - गेल्या वर्षी मुकेश कुमार बांगलादेश-ए विरुद्ध घेळल्या गेलेल्या मालिकेत टीम इंडिया ए साठी खेळला होता. या मालिकेत दोन सामन्यांत त्याने 9 बळी मिळवले होते. त्याने आतापर्यंत 38 फर्स्ट क्लास सामन्यांत 145 बळी घेतले आहेत. लिस्ट-ए मध्ये त्याने 24 सामन्यांत 26 बळी घेतले आहेत.