Join us  

भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी

Indian Cricketer Father Duped: फसवणूक झाल्याचे आणि पैसे दिल्याचे पुरावे असल्याने पोलिसांनी दाखल केला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 1:54 PM

Open in App

Indian Cricketer Father Duped: भारतीय क्रिकेटपटू राहुल चहरचे ( Rahul Chahar ) वडील देशराज सिंह चहर ( Deshraj Singh Chahar ) यांच्याची संदर्भात फसवणुकीचे एक मोठे प्रकरण उघड झाले आहे. अहवालानुसार, एका बिल्डरने त्यांची २६.५० लाख रुपयांची फसवणूक ( Fraud Case ) केली आहे. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी ( Death Threat ) दिली आहे. राहुलच्या वडीलांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे. नरसी व्हिलेजचे मालक वासुदेव गर्ग, कर्मचारी अरुण गुप्ता आणि पियुष गोयल यांनी एका जमिनीवर घर बांधण्यासाठी पैसे घेतले होते, मात्र १२ वर्षे उलटूनही त्यांनी पैसे परत केलेले नाहीत असा आरोप राहुलच्या वडिलांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

राहुल चहरच्या वडिलांनी कंपनीशी संबंधित तीन जणांवर खुनाची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. १२ वर्षांपासून या प्रकरणात काहीही अपडेट मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुस्थानच्या रिपोर्टनुसार, जेव्हा राहुलचे वडील ५ जून २०२४ रोजी विक्रीच्या करारावर स्वाक्षरी करण्याच्या मागणीसाठी गेले, तेव्हा त्यांना तेथे अरुण गुप्ता आणि पीयूष गोयल भेटले. त्यावेळी त्या दोघांनीही राहुलच्या वडीलांना शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांची पुन्हा भेट झालेली नाही. या प्रकरणात राहुल चहरच्या वडिलांना आग्राच्या डीसीपींनी सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे. डीसीपी सिटी सूरज कुमार राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल चहरच्या वडिलांकडे घरासाठी दिलेल्या पैशांचा पुरावा आहे. त्याच आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुराव्याच्या आधारे तपास करून कारवाई केली जाईल.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

राहुल चहरचे वडील देशराज सिंह चहर यांनी २०२४ मध्ये याप्रकरणी तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी प्रथम तपास केला आणि जेव्हा बिल्डर भूखंडावर बांधलेले घर देण्यास तयार नव्हते, तेव्हा त्यांनी गुन्हा दाखल केला. राहुलच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, कंपनीचे मालक वासुदेव गर्ग यांनी नरसी व्हिलेज नावाने वसाहत बांधली. २०१२ मध्ये त्यांनी याच कॉलनीत दोन प्लॉट बुक केले होते, ज्यावर कंपनी घर बांधणार होती. बिल्डरने २०१६ मध्ये त्यातील एक भूखंड दुसऱ्याला विकला. राहुलच्या वडिलांना याची माहिती मिळताच त्यांनी वासुदेव गर्ग यांच्याकडे त्यांची अनामत रक्कम मागितली, ती त्यांना परत मिळाली.

घर दुसऱ्याला विकण्याचा प्रयत्न

यानंतर देशराज सिंह यांनी २०१८ मध्ये मुलगा राहुल चहरच्या नावावर दुसरा प्लॉट हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला. त्यासाठी त्यांच्याकडून ३२ हजार रुपये ट्रान्सफर फी घेण्यात आली, ती कंपनीने आजपर्यंत त्याच्याकडे सुपूर्द केलेली नाही. एवढेच नाही तर प्लॉटवर घर बांधण्यासाठी २६.५० लाखांची उर्वरित रक्कमही दिलेली आहे. घर बांधूनही बांधकाम व्यावसायिक वासुदेव गर्ग यांनी 'डीड' केलेले नाही. बिल्डरने प्लॉटप्रमाणेच घर दुसऱ्याला विकण्याचा प्लॅन असल्याचा आरोप राहुलच्या वडीलांनी केला आहे.

टॅग्स :धोकेबाजीभारतीय क्रिकेट संघमृत्यूगुन्हेगारी