Join us

क्रिकेटर रिंकू सिंगने केला महिला खासदाराशी साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे 'ती' तरूणी?

Rinku Singh Engagement : रिंकू सिंग हा गेल्या २-३ वर्षांत टीम इंडियासाठी महत्त्वाचा मॅच फिनिशर म्हणून भूमिका बजावतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:07 IST

Open in App

Rinku Singh Engagement : टीम इंडियाचा फलंदाज रिंकू सिंगने उत्तर प्रदेशच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत साखरपुडा केल्याची माहिती मिळाली आहे. प्रिया सरोज (Priya Saroj) या समाजवादी पक्षाच्या खासदार (MP) आहेत. रिंकू सिंग हा डावखुरा फलंदाज गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत असून आता तो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रिंकू सिंगची जोडीदार प्रिया सरोज यांनी भाजपचे दिग्गज नेते बीपी सरोज यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी त्या लोकसभेत पोहोचल्या. त्यांच्याशी रिंकूने साखरपुडा केल्याची माहिती देण्यात येत आहे. अद्याप रिंकूने मात्र याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

कोण आहेत प्रिया सरोज?

रिंकू सिंगच्या जोडीदाराबद्दल सांगायचे तर, अवघ्या २५ व्या वर्षी प्रिया सरोज खासदार बनल्या. त्यांनी मच्छली शहरातून लोकसभा निवडणूक जिंकली. प्रिया सरोज या सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. प्रिया सरोजचे वडील तुफानी सरोज हे देखील मच्छली शहर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी १९९९, २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या. यानंतर त्यांची मुलगी प्रिया सरोज हिने मच्छली शहरचे प्रतिनिधित्व केले आणि देशातील दुसऱ्या सर्वात तरुण खासदार म्हणून निवडून आल्या.

रिकू सिंग एक अप्रतिम मॅच फिनिशर

रिंकू सिंग भारतीय संघातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये त्याची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. रिंकू सिंगने टीम इंडियासाठी ३० टी२० सामन्यांमध्ये ४६ पेक्षा जास्त सरासरीने ५०७ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही १६० पेक्षा जास्त आहे. रिंकूने टीम इंडियासाठी २ वनडे सामनेही खेळले आहेत. याशिवाय रिंकू सिंग हा आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचा महत्त्वाचा भाग आहे. रिंकू सिंगला IPL 2025 साठी कोलकाता नाईट रायडर्सने कायम ठेवले आहे. रिंकू सिंगला या मोसमासाठी १३ कोटी रुपये मिळणार आहेत.

टॅग्स :रिंकू सिंगसमाजवादी पार्टीखासदारभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ