२०२० चा शेवट गोड झाला!, आता नववर्षातील टीम इंडिया कोणकोणाला भिडणार?; जाणून घ्या २०२१चे वेळापत्रक

आता २०२१ वर्ष सुरू होईल आणि या वर्षाची सुरुवात दणक्यात करण्याचा निर्धार टीम इंडियानं केला आहे. बॉक्सिंग डे कसोटीतील विजयानं त्यांना तसा आत्मविश्वासही मिळाला आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: December 30, 2020 09:23 AM2020-12-30T09:23:28+5:302020-12-30T09:25:15+5:30

whatsapp join usJoin us
Team India end 2020 on winning note; know Indian Cricket Team full Schedule For 2021 in one click | २०२० चा शेवट गोड झाला!, आता नववर्षातील टीम इंडिया कोणकोणाला भिडणार?; जाणून घ्या २०२१चे वेळापत्रक

२०२० चा शेवट गोड झाला!, आता नववर्षातील टीम इंडिया कोणकोणाला भिडणार?; जाणून घ्या २०२१चे वेळापत्रक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसच्या संकाटाशी मुकाबला करण्यातचं २०२० हे वर्ष सर्वांनी खर्ची घातले. कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आला आणि त्यामुळे क्रिकेटसह ऑलिम्पिक, चॅम्पियन्स लीग आदी मोठ्या स्पर्धांना फटका बसला. आता परिस्थिती हळुहळू पुर्वपदावर येत आहे आणि क्रीडा स्पर्धांनाही सुरुवात झाली आहे. भारतीय चाहत्यांसाठी २०२० हे वर्ष निराशाजनक राहिले. पण, इंडियन प्रीमिअर लीगनं ( IPL 2020) त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. त्यात अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवून २०२०चा शेवट गोड केला. भारतानं दुसऱ्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियावर ८ विकेट राखून विजय मिळवताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.

आता २०२१ वर्ष सुरू होईल आणि या वर्षाची सुरुवात दणक्यात करण्याचा निर्धार टीम इंडियानं केला आहे. बॉक्सिंग डे कसोटीतील विजयानं त्यांना तसा आत्मविश्वासही मिळाला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी सामना ७ ते ११ जानेवारीला सिडनीत खेळवला जाईल. त्यानंतर  १५ ते १९ जानेवारीला चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे होईल. या मालिकेनंतर टीम इंडिया मायदेशात परतणार आहे. थोड्याशा विश्रांतीनंतर टीम इंडिया २०२१ हे वर्ष गाजवण्यासाठी पुन्हा मैदानावर उतरेल. २०२१मध्ये भारतीय संघासमोर अनेक तगडी आव्हानं आहेत. भारतीय संघ जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत १४ कसोटी, १६ वन डे व २३ ट्वेंटी-20 सामने खेळणार आहेत. त्याव्यतिरिक्त आशिया चषक ट्वेंटी-20 ( जून), आयसीसी वर्ल्ड कप ( ऑक्टोबर) आणि आयपीएल 2021 हे आहेच.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून जानेवारी मायदेशात परतल्यानंतर टीम इंडिया दोन महिने इंग्लंड संघाचा पाहुणचार घेणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्यात ४ कसोटी, ४ वन डे व ४ ट्वेंटी-20 सामने होतील. 


असा असेल इंग्लंडचा भारत दौरा ( England Tour of India, Time Table) 
 

  • कसोटी मालिका ( Test Series) 
     

पहिली ५ ते ९ फेब्रुवारी - चेन्नई, 
दुसरी चेन्नई १३ ते १७ फेब्रुवारी- चेन्नई
तिसरी २४ ते २८ फेब्रुवारी- अहमदाबाद
चौथी ४ ते ८ मार्च -अहमदाबाद

  • ट्वेंटी-20 ( T-20 Series) (सर्व सामने अहमदाबाद)

 १) १२ मार्च पहिला ट्वेंटी-20
२) १४ मार्च दुसरा ट्वेंटी-20
३) १६ मार्च तिसरा ट्वेंटी-20
४) १८ मार्च चौथा ट्वेंटी-20
५) २० मार्च पाचवा ट्वेंटी-20
 

  • वन-डे मालिका ( One Day Series) (सर्व सामने पुणे येथे)

१) २३ मार्च पहिला वन-डे
२) २६ मार्च दुसरा वन-डे
३) २८ मार्च तिसरा वन-डे

त्यानंतर मार्च ते मे या कालावधीत इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League)  १४ व्या पर्वाचे आयोजन करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. आयपीएलनंतर भारत तीन वन डे व पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर जून अखेरीस ते जुलै मध्यंतरापर्यंत श्रीलंकेतच आशिया चषक होणार आहे. जुलै महिन्यातच भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. त्या दौऱ्यावर टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता अधिक आहे. तेथे भारतीय संघ तीन वन डे सामने खेळेल. 

जुलै ते सप्टेंबर या कालावधीत भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे. त्या दौऱ्यावर तीन वन डे व पाच ट्वेंटी-20 सामने होतील. आफ्रिके मालिकेनंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे आयोजन भारतच करणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होईल. नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येईल. त्यात दोन कसोटी व तीन ट्वेंटी-20 सामने खेळले जातील. डिसेंबरमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन कसोटी व तीन ट्वेंटी-20 सामने खेळेल.

जानेवारी २०२२मध्ये वेस्ट इंडिज मालिका, श्रीलंका मलिका होईल. मार्चमध्ये न्यूझीलंडविरुद्धची मालिका आणि आयपीएल 2022. जुलैमध्ये इंग्लंड दौरा, वेस्ट इंडिज दौरा होईल. सप्टेंबरमध्ये आशिया चषक आणि त्यानंतर आशिया चषक २०२२, बांगलादेश दौरा होईल. डिसेंबरमध्ये श्रीलंका भारत दौऱ्यावर येणार आहे.
 

Web Title: Team India end 2020 on winning note; know Indian Cricket Team full Schedule For 2021 in one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.