Ravi Shastri On Rohit Sharma And Virat Kohli Rift : माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ७ वर्ष टीम इंडियामध्ये प्रशिक्षकाची भूमिका बजावली. रवी शास्त्री हे इतरांसमोर आपले परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी नुकतेच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विराट आणि रोहित यांच्यातील मतभेदाच्या अफवांना रवी शास्त्री यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मोहम्मद शमीला नेमकं काय झालंय? BCCI ने अपडेट्स दिले अन् नव्या गोलंदाजाला संघात घेतले
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील मतभेदाच्या बातम्या अनेकदा मीडियात आल्या आहेत. या मुद्द्यावर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, कोहली आणि रोहितमध्ये सर्व काही ठीक आहे. मीडियामुळेच अशा बातम्या दिल्या जातात. अशा कोणत्याही बातम्यांसाठी माझ्याकडे वेळ नाही. वो सब भड मे गया यार! तुमच्यासाठी हा सगळा टाईमपास आहे. सर्वकाही ठीक आहे. ते शतकी भागीदारी करत आहेत आणि तुम्ही लोक मूर्खपणाने बोलत आहात. या सर्व माझ्यासाठी छोट्या गोष्टी आहेत आणि मी अशा गोष्टींवर वेळ वाया घालवत नाही.
रवी शास्त्री विमल कुमारच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होते. रवी शास्त्री यांनी कोहली फॉर्मात परतण्याकडे लक्ष दिले. रवी शास्त्री यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराटची पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावांची खेळी केली ही सर्वोत्तम वाटते. ते म्हणाले, 'मला वाटते की त्याच्या कारकिर्दीतील ही त्याची सर्वोत्तम ट्वेंटी-२० खेळी आहे आणि यात शंका नाही. कारण स्पर्धा खूप मोठी होती आणि तो सामना पाकिस्तानविरुद्ध होता. भारत या सामन्यात बॅकफूटवर होता, त्यामुळे दबावाखाली धावा काढणे ही मोठी गोष्ट आहे.''
भारतीय संघ सध्या तीन वन डे व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी बांगलादेश दौऱ्यावर दाखल झाला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर विराट, रोहित, लोकेश, अश्विन यांनी विश्रांती घेतली होती आणि न्यूझीलंड दौऱ्यावर गेले नव्हते. आता विश्रांतीनंतर त्यांच्या वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेच्या तयारीला सुरुवात होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"