Ravi Shastri Swag Look : 'तुमच्या आत हार्दिक पांड्या व रणवीर सिंग दोघंही लपले आहेत'!; रवी शास्त्रींच्या स्वॅग लूक्सवर नेटिझन्स फिदा 

भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर हवा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 03:51 PM2022-05-20T15:51:40+5:302022-05-20T15:52:23+5:30

whatsapp join usJoin us
Team India Ex-Head Coach Ravi Shastri Swag look goes Viral, fan comparing him with Hardik Pandya and Ranveer Singh   | Ravi Shastri Swag Look : 'तुमच्या आत हार्दिक पांड्या व रणवीर सिंग दोघंही लपले आहेत'!; रवी शास्त्रींच्या स्वॅग लूक्सवर नेटिझन्स फिदा 

Ravi Shastri Swag Look : 'तुमच्या आत हार्दिक पांड्या व रणवीर सिंग दोघंही लपले आहेत'!; रवी शास्त्रींच्या स्वॅग लूक्सवर नेटिझन्स फिदा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर हवा केली आहे. सकाळी त्यांनी ट्विटवर एक फोटो पोस्ट केला आणि तो पाहून नेटिझन्स सुसाट सुटले. शास्त्री स्वॅग लूकमध्ये दिसत आहेत आणि त्यांचा हा नवा लूक पाहून सारे खुश झाले. या फोटो त्यांनी काळा चष्मा, जॅकेट आणि गळ्यात चैन घातलेली दिसतेय. त्यावर त्यांनी लिहिले की, जर तुम्ही रात्रभर झोपलाच नसाल, तर गुड मॉर्निंग हा केवळ पर्याय उरतो. 
 


त्यानंतर शास्त्रींनी आणखी एक फोटो पोस्ट केला आणि त्यात त्यांनी लिहिले की, माझे कुटूंब मुंबईत राहते आणि मी या क्षणात राहतो. ते इथेच थांबले नाही. त्यांनी काही तासानंतर आणखी एक ट्विट केले आणि त्यात ते गुलाबी रंगाच्या कोटमध्ये दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत एक वृद्ध महिला दिसत आहे.  

२०१४साली रवी शास्त्री यांची आठ महिन्यांकरीता भारतीय संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २०१७मध्ये ते मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू झाले आणि १६ ऑगस्ट २०१९मध्ये त्यांची फेरनिवड झाली. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं ४३ कसोटींत २५ विजय व १३ पराजय पत्करले आहेत. ५ सामने बरोबरीत सुटले. ७६ वन डे पैकी ५१ विजय , २२ पराजय,  तर ६५  ट्वेंटी-२०त ४३ विजय व १८ पराजय असा शास्त्री यांचा प्रशिक्षक म्हणून प्रवास आहे.

त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियानं दोन वेळा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत धुळ चारली. ७० वर्षांनंतर भारतीय संघआनं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई संघ ठरला. ४० महिने भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर होता. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे मर्यादित षटकांची मालिका जिंकण्याचा पराक्रम.

नेटिझन्सनी घेतली मजा...




Web Title: Team India Ex-Head Coach Ravi Shastri Swag look goes Viral, fan comparing him with Hardik Pandya and Ranveer Singh  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.