Join us  

India vs Australia, 3rd Test : अजिंक्य रहाणेचा त्रिफळा उडाला, हनुमा विहारीला अति घाई महागात पडली, पाहा Video

India vs Australia, 3rd Test Day 3: ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियानं दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात दोन्ही सलामीवीर गमावले

By स्वदेश घाणेकर | Published: January 09, 2021 7:04 AM

Open in App

India vs Australia, 3rd Test Day 3: भारतीय संघाला तिसऱ्या दिवसाची अपेक्षित सुरुवात करण्यात अपयश आलं. मेलबर्न कसोटीतील शतकवीर टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) सिडनीत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मयांक अग्रवालला डावलून सातत्यानं अपयशी ठरत असलेल्या हनुमा विहारीला ( Hanuma Vihari) संघात कायम ठेवण्याचा निर्णय चुकल्याचे पाहायला मिळाले. अजिंक्य माघारी परतल्यानंतर विहारीला मोठी खेळी करून त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची संधी होती, परंतु अति घाई करणे त्याला महागात पडले. 

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियानं दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात दोन्ही सलामीवीर गमावले. रोहित शर्मा २६, तर शुबमन गिल ५० धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार अजिंक्य व चेतेश्वर पुजारा यांनी दिवसअखेर भारताचा डाव सावरला आणि २ बाद ९६ धावांवर खेळ थांबला. तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या खात्यात २१ धावांची भर घालून अजिंक्य माघारी परतला. पॅट कमिन्सच्या उसळी घेतलेला चेंडू बॅटवर आदळून स्टम्प्सचा वेध घेऊन गेला. अजिंक्य २२ धावांवर बाद झाला. विहारीला संधीचं सोनं करण्याची संधी होती, परंतु नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेणं महागात पडले आणि जोश हेझलवूडनं अप्रतिम थ्रो करत त्याला ( ४) धावबाद केले. पुजारा आणि रिषभ पंत खेळपट्टीवर आहेत. लंच ब्रेकपर्यंत भारतानं ४ बाद १८० धावा केल्या आहेत. पहिल्या सत्रात भारतानं ८४ धावांवर दोन विकेट्स गमावल्या. 

पाहा दोन्ही विकेट्स..

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजारारिषभ पंत