नवी दिल्ली : मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिन्ही मालिकांसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऋतुराजने शतक झळकावले. या मालिकेनंतर टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, तीन फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरूवारी आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली.
लक्षणीय बाब म्हणजे ऋतुराज गायकवाडला आगामी तिन्ही मालिकांमध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळे मोठ्या व्यासपीठावर चमकदार कामगिरी करून स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी ऋतुराजकडे असेल. आफ्रिकेविरूद्धच्या वन डे मालिकेतून शुबमन गिलला विश्रांती दिल्यामुळे कर्णधार लोकेश राहुलसोबत ऋतुराज सलामीला येऊ शकतो. १७ डिसेंबर ते २१ डिसेंबरदरम्यान तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाणार आहे.
भारताचा वन डे संघ -
लोकेश राहुल (कर्णधार), युझवेंद्र चहल, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजित पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर.
भारताचा ट्वेंटी-२० संघ -
सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
भारताचा कसोटी संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, लोकेश राहुल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.
ट्वेंटी-२० मालिका
१० डिसेंबर - डर्बन, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
१२ डिसेंबर - जीकबेर्हा, रात्री ८.३० वाजल्यापासून
१४ डिसेंबर - जोहान्सबर्ग, रात्री ८.३० वाजल्यापासून
वन डे मालिका
१७ डिसेंबर - जोहान्सबर्ग, दुपारी १.३० वाजल्यापासून
१९ डिसेंबर - जीकबेर्हा, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून
२१ डिसेंबर - पर्ल, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून
कसोटी मालिका
२६ ते ३० डिसेंबर - दुपारी १.३० वाजल्यापासून
३ ते ७ जानेवारी - दुपारी १.३० वाजल्यापासून
Web Title: Team India for the tour of South Africa has been announced and Ruturaj Gaikwad has been named in the squad for the three series ODI, T20 and Test series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.