India Pakistan Cricket: पाकिस्तानी खेळाडूंना सुधारणार 'टीम इंडिया'चा ट्रेनर, लाहोरमध्ये सुरू झाला खास उपक्रम

T20 वर्ल्ड कपची पाकिस्तानकडून कसून तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 11:37 PM2022-09-09T23:37:21+5:302022-09-09T23:38:26+5:30

whatsapp join usJoin us
Team India former strength and conditioning coach nick webb joins coaching project for Pakistan cricket programme | India Pakistan Cricket: पाकिस्तानी खेळाडूंना सुधारणार 'टीम इंडिया'चा ट्रेनर, लाहोरमध्ये सुरू झाला खास उपक्रम

India Pakistan Cricket: पाकिस्तानी खेळाडूंना सुधारणार 'टीम इंडिया'चा ट्रेनर, लाहोरमध्ये सुरू झाला खास उपक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Pakistan Cricket: भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सध्या प्रचंड स्पर्धा आहे. एखाद्या सामन्यात मॅच-विनिंग खेळी करूनही पुढच्या सामन्यात संधी मिळेलच, याबद्दल खेळाडू साशंक असतात. त्यामुळे टीम इंडियाचे सर्वच खेळाडू आपल्या फिटनेसवर लक्ष देऊन असतात. पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसचीही अनेकदा चर्चा होत असते. मात्र ती नकारात्मक पद्धतीने होते. असे असताना त्यांच्या फिटनेसमध्ये सुधारणा आणण्यासाठी आता 'टीम इंडिया'च्या संघ व्यवस्थापनातील माजी सदस्य मदत करणार आहे. भारताचा माजी प्रशिक्षक निक वेब (Nick Webb) पाकिस्तानमध्ये दाखल झाला आहे. तो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अँग्रो क्रिकेट कोचिंग प्रोजेक्टचा एक भाग आहे.

निक वेबने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून माहिती दिली. त्याने लिहिले आहे की, पहिल्याच दिवशी नव्या रंगात मी इथे पोहोचलोय. कार्यक्रमाचा पहिला टप्पा लाहोरमध्ये सुरू झाला आहे. निक वेबसह ५  परदेशी खेळाडू या प्रकल्पाचा भाग आहेत. ते खेळाडूंना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे विशेष प्रशिक्षण देणार आहेत.

निक वेबच्याबद्दल बोलायचे तर, तो २०१९ पासून टीम इंडियासोबत होता. त्याने शंकर बसू यांची जागा घेतली होती. परंतु गेल्या वर्षी UAE मध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकानंतर त्याने भारताचे strength and conditioning coach या पदाचा राजीनामा दिला. कोरोना महामारीच्या काळात त्याला कुटुंबासोबत वेळ घालवायचा होता. त्याने कुटुंबाला प्राधान्य दिले. या कारणास्तव त्याने राजीनामा दिला. तो तेथून थेट न्यूझीलंडला गेला. मात्र आता तो पाकिस्तानी खेळाडूंना ट्रेनिंग देण्यास सज्ज झाला आहे.

 

Web Title: Team India former strength and conditioning coach nick webb joins coaching project for Pakistan cricket programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.