एकदिवसीय विश्वचषक 2023, हे टीम इंडियासाठी या वर्षातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये झालेल्या पराभवानंतर, आता भारतात खेळवला जाणारा एकदिवसीय विश्वचषक 2023 रोहित शर्मासाठी एक मोठी परीक्षा असेल. या विश्वचषकासाठी रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असेल. त्याच्यावर विश्वचषक जिंकण्याचे दडपण असेल. या विश्वचषकानंतर 35 वर्षीय रोहित शर्माला टीम इंडियाच्या वनडे संघाचे नेतृत्व करणे कठीन जाईल.
रोहितनंतर हा खतरनाक खेळाडू होईल एकदिवसीय संघाचा कर्णधार?
भारतीय संघात एक खतरनाक खेळाडू रोहित शर्माची जागा घेण्यास तयार आहे. हा खेळाडू एकदिवसीय आणि टी-20 संघाचाही कर्णधार होऊ शकतो. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर, 35 वर्षीय रोहित शर्माच्या जागी स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याला भारतीय संघाचा कर्णधार केले जाऊ शकते. तो एकदिवसीय आणि टी-20 इंटरनॅशनलमध्ये संघाचे नेतृत्व करू शकतो. आपल्या कर्णधारपदाच्या डेब्यूमध्येच हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सला आयपीएल 2022 ची ट्रॉफी जिंकून दिली होती.
नेतृत्वात दिसते धोनीची झलक -
हार्दिक पांड्या नेतृत्वात माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची झलक दिसते. हार्दिक पांड्यामध्ये कर्णधार होण्याचे सर्व गूण आहेत. तो फलंदाजी करतानाही संयमाने खेळतो. याशिवाय तो 140 किमी प्रति तास एवढ्या वेगाने गोलंदाजीही करू शकतो. विशेष म्हणजे, त्याचे क्षेत्ररक्षणही अप्रतीम आहे. त्याची तुलना भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यासोबतही केली जाते. तर तो टीम इंडियाचा कर्णधार बनला, तर कपिल देव यांच्या प्रमाणेच सिद्ध होऊ शकतो.
कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे -
खरे तर रोहित शर्मानंतर चार खेळाडू भारतीय कर्णधार बनण्याच्या शर्यतीत आहेत. यात केएल राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांना कर्णधार पदाचे दावेदार माणले जात होते. मात्र आता हार्दिक या शर्यतीत सर्वात पुढे आहे.
Web Title: Team India: hardik pandya may become the captain of the Indian ODI team after Rohit There is a glimpse of Dhoni
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.