कॅनबरा : वन-डे मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ शुक्रवारपासून प्रारंभ होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रलियाला कडवे आव्हान देण्यास सक्षम आहे. भारतीय संघाकडे पर्यायांची उणीव नाही. वन-डे मालिकेत १-२ ने पराभूत झाल्यानंतर ५० षटकांच्या क्रिकेटमधील भारतीय संघातील उणिवा चव्हाट्यावर आल्या. टी-२० मध्ये भारताकडे संतुलित संघ आहे.
कोरोना महामारीपूर्वी भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. वाॅशिंग्टन सुंदर, दीपक चाहर व वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पणासह शानदार कामगिरी करणाऱ्या नटराजन यांच्यामुळे भारतीय संघाचा समतोल साधल्या गेला आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरतर्फे पॉवर प्लेदरम्यान कर्णधार विराट कोहलीने वापर केला त्यावेळी सुंदरने शानदार कामगिरी केली होती. हार्दिक पांड्या नियमित गोलंदाजी करू शकत नाही.
एकूण टी-२० सामने २१भारत विजयी ११ऑस्ट्रेलिया विजयी ८सामना रद्द १निकाल नाही १२००७ च्या पहिल्या सामन्यात भारत विजयी तर २०१९ च्या अखेरच्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव झाला होता.ऑस्ट्रेलियात टी-२० मालिकेतील भारताची कामिगरीएकूण मालिका ४भारत विजयी १ऑस्ट्रेलिया विजयी १बरोबरीत २ऑस्ट्रेलियात टी-२० सामन्यांत भारताची कामगिरीएकूण सामने ८भारत विजयी ५ऑस्ट्रेलिया विजयी ३अनिर्णीत ०
प्रतिस्पर्धी संघ भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, टी नटराजन. आस्ट्रेलिया : ॲरोन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एश्टोन एगर, एलेक्स कारे, पॅट कमिंस, कॅमरन ग्रीन, जोश हेजलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डेनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, डार्सी शॉर्ट , एडम झम्पा.
सलामीला कोण याबाबत उत्सुकता कर्णधार ॲरोन फिंचच्या साथीने सलामीला मार्नस लाबुशेन खेळतो की दुसरा कुणी, याबाबत उत्सुकता आहे. मार्कस स्टोइनिस डावाची सुरुवात करू शकतो, पण वन-डेमध्ये तोही दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.