भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक होणार हे आता जवळपास निश्चित आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आयपीएमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने यंदाचा किताब जिंकला. त्यामुळे चाहत्यांसह अनेक माजी खेळाडूंसह जाणकारांनी गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हावा असे मत मांडले. भारताचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या पदाचा कार्यकाळ ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ नंतर संपणार आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय संघातील शिलेदारांना क्रिकेटचे धडे देण्याची जबाबदारी गंभीरवर असेल. गंभीरचे कौतुक करताना पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने एक मोठे विधान केले.
तो म्हणाला की, गौतम गंभीर ज्या गोष्टीला हात लावतो, त्या गोष्टीचे सोनं बनते. तो ज्या गोष्टीसोबत जोडला जातो तिथे नक्कीच यश मिळते. भारतीय संघाला परदेशी प्रशिक्षकाची गरज नाही. त्यांच्याकडे भरपूर पर्याय आहेत. राहुल द्रविडनंतर या पदासाठी गौतम गंभीरपेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. तो एक मोठा खेळाडू आहे आणि आगामी काळात एक चांगला प्रशिक्षक म्हणूनही समोर येईल. अकमल 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलत होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गंभीर आणि बीसीसीआय यांच्यात सर्व बाबींवर आधीच चर्चा झाली आहे. याशिवाय भारतीय क्रिकेट बोर्डानेही गंभीरच्या सर्व अटी मान्य केल्या असल्याचे बोलले जात आहे. त्याला त्याच्या पसंतीचा सपोर्ट स्टाफ देण्यात यावा, अशी गंभीरची मागणी होती. तसेच गंभीरने संघातील काही बदलांबाबतही भूमिका मांडली होती. या अटी बीसीसीआयला मान्य असल्याचे सांगितले जात आहे.
Web Title: Team India Head Coach former pakistan's player kamran akmal on gautam Gambir
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.