Sourav Ganguly Post : भारतीय क्रिकेट संघाचा पुढचा प्रशिक्षक कोण असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा लवकरच कार्यकाळ संपणार आहे. अनेक माजी खेळाडू या पदासाठी प्रबळ दावेदार आहेत. मात्र, नक्की कोणी या पदासाठी अर्ज केला आहे हे स्पष्ट नाही. टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. अशातच माजी कर्णधार सौरव गांगुलीने एक बोलकी पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले. (Gautam Gambhir India Coach)
आयपीएल २०२४ चा अंतिम सामना झाल्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह आणि गौतम गंभीर यांच्यात चर्चा झाली. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएल जिंकली. या भेटीनंतर गंभीरच पुढचा प्रशिक्षक असेल असा तर्क चाहत्यांनी लावला. गांगुलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत हुशार प्रशिक्षक निवडण्याचा सल्ला दिला.
गांगुलीचा सल्ला अन्... गांगुलीने म्हटले की, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रशिक्षकाचे महत्त्व खूप असते. प्रशिक्षक मार्गदर्शन आणि सततच्या सराव करून घेतो... याने कोणत्याही व्यक्तीचे भविष्य बदलत असतो. तो मैदानात असो की मग मैदानाबाहेर. त्यामुळे प्रशिक्षकाची निवड खूपच हुशारीने करायला हवी. खरे तर गांगुलीच्या या पोस्टने चाहते संभ्रमात पडले आहेत. अनेकांनी या पोस्टला गौतम गंभीरशी जोडले.
दरम्यान, मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे होती. यासाठी किती जणांनी अर्ज केले आहेत, हे देखील समोर आले आहे. यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी अशा काही बनावट नावांचा समावेश आहे. BCCI ने अलीकडेच मुख्य प्रशिक्षकपदासाठी रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांच्याशी संपर्क साधण्यास नकार दिला होता. गंभीरने या पदासाठी अर्ज केला असेल भूमिका स्वीकारली असली, तर त्याला KKRचे मार्गदर्शक म्हणून आपले स्थान सोडावे लागेल. गंभीरने कर्णधार म्हणून KKR सोबत दोन वेळा आयपीएल जिंकली आहे.
BCCI च्या प्रशिक्षकपदासाठी अटी -- नवीन प्रशिक्षक हा १ जुलै, २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ या काळासाठी असणार आहे. - प्रशिक्षक पदासाठी उच्छुक उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे.- कमीतकमी ३० कसोटी, ५० वनडे सामने खेळण्याचा अनुभव असावा तसेच कमीतकमी दोन वर्षांचा एखाद्या पूर्णवेळ संघाचा प्रशिक्षक पदाचा अनुभव असावा.