Ravi Shastri Age : रवी शास्त्री चक्क १२० वर्षांचे झाले!

Ravi Shastri age on google : रवी शास्त्री १२० वर्षांचे कसे झाले? तुम्हीच पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 12:47 PM2021-02-06T12:47:04+5:302021-02-06T12:51:05+5:30

whatsapp join usJoin us
team india head coach Ravi Shastri age is 120 on Google search | Ravi Shastri Age : रवी शास्त्री चक्क १२० वर्षांचे झाले!

Ravi Shastri Age : रवी शास्त्री चक्क १२० वर्षांचे झाले!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri ) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघानं ( Team India ) ऑस्ट्रेलियात शानदार कामगिरी केली. भारतीय संघाचा या जबरदस्त कामगिरीचं श्रेय प्रशिक्षक रवी शास्त्रींना देखील जातं. संघातील महत्वाचे खेळाडू बाहेर असतानाही नव्या दमाच्या खेळाडूंच्या साथीनं त्यांनी संघ बांधला. याबाबतच शास्त्री यांचं कौतुक केलं गेलं. पण आता पुन्हा एकदा रवी शास्त्री चर्चेत आले आहेत. (Ravi Shastri age is 120 on google search)

इंटरनेटच्या महाजालातील गुगल या सर्च इंजिनने रवी शास्त्री यांचं वय चक्क १२० वर्ष असल्याचं दाखवलं आहे. वाचून आश्चर्य वाटलं असेल ना? पण हे खरंय. आताही आपण ravi shastri age असं गुगल करुन पाहिलं की शास्त्री हे १२० वर्षांचे असल्याचं गुगलचं म्हणणं आहे. विकीपीडियामध्ये शास्त्रींचा जन्म हा २७ मे १९०० असा दाखवण्यात येतोय. त्यामुळे त्यांचं वय हे १२० वर्ष असल्याचं गुगल सर्चमध्ये दिसून येत आहे. 

रवी शास्त्रींचं खरं वय काय?
रवी शास्त्री यांचा जन्म २७ मे १९६२ रोजी मुंबईत झाला होता. ते सध्या ५८ वर्षांचे आहेत. त्यांनी भारताकडून ८० कसोटी आणि १५० एकदिवसीय सामने खेळले आहेत. शास्त्री यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ११ खणखणीत शतकं ठोकलेली आहेत. तर १ द्विशतकही केलं आहे. कसोटी कारकिर्दीत त्यांनी ३ हजार ८०६ धावा केल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रवी शास्त्री बराच काळ समालोचक देखील होते. त्यानंतर २०१९ साली त्यांना भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा आलेख चढता राहिला आहे. 
 

Web Title: team india head coach Ravi Shastri age is 120 on Google search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.