भारतात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तानचे संघ भारतात येऊन पोहोचले आहेत. अशातच टीम इंडियात कोण कोण असतील याची उत्सुकता सर्वांना होती, ती आता संपली आहे. इतर सर्व देशांनी आपापल्या टीम्सची घोषणा केली होती, परंतू भारताने आपले पत्ते खोलले नव्हते.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२३ चे बिगुल ५ ऑक्टोबरला वाजणार आहे. सर्व 10 संघांना 2-2 सराव सामने खेळायचे आहेत. टीमच्या खेळाडूंच्या बदलांची अखेरची तारीख २८ सप्टेंबर देण्यात आली होती. याच दिवशी भारताने आपला संघ जाहीर केला आहे.
भारतीय संघाने मोठा बदल केला आहे. दुखापतग्रस्त असलेला स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धही अश्विनला संधी देण्यात आली होती. भारतीय संघाला विश्वचषकापूर्वी २ सराव सामने खेळायचे आहेत. संघाला 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळायचा आहे.
विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा अंतिम संघ:रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शमी आणि शार्दुल ठाकूर.