Team India in Latest ICC Rankings: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२०तील अव्वल स्थान; कसोटी, वन डे यांच्यात बघा कितवा क्रमांक!

Team India in Latest ICC Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी वार्षिक क्रमवारी जाहीर केले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 04:12 PM2022-05-04T16:12:37+5:302022-05-04T16:13:09+5:30

whatsapp join usJoin us
Team India in Latest ICC Rankings: Rohit Sharma led India retains number 1 Position in ICC Men’s T20 Rankings, Test - 2nd Spot, ODI - 4th Spot   | Team India in Latest ICC Rankings: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२०तील अव्वल स्थान; कसोटी, वन डे यांच्यात बघा कितवा क्रमांक!

Team India in Latest ICC Rankings: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२०तील अव्वल स्थान; कसोटी, वन डे यांच्यात बघा कितवा क्रमांक!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India in Latest ICC Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी वार्षिक क्रमवारी जाहीर केले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. इंग्लंडचा संघ दुसऱ्या, तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाच्या खात्यात २७० रेटींग गुण आहेत, तर इंग्लंड ( २६५ ) व पाकिस्तान ( २६१) हे मागे आहेत. भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी बाजूला ठेऊन त्यानंतर झालेल्या १२ ट्वेंटी-२० सामन्यांत विजय मिळवले आहेत. 

विराट कोहलीने ट्वेंटी-२०चे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितकडे ही जबाबदारी आली आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंड, वेस्ट इंडिज व श्रीलंका यांच्यावर विजय मिळवले. या मालिकेत भारताने एकही सामना गमावला नाही. ट्वेंटी-२० क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेने २५३ रेटींग गुणांसह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता ऑस्ट्रेलियाचा संघ २५१ रेटींग गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड ( २५०), वेस्ट इंडिज ( २४०), बांगलादेश ( २३३) व श्रीलंका ( २३०) यांचा क्रमांक त्यापाठोपाठ येतो. अफगाणिस्तानची दोन स्थानांनी घसरण झाली आहे आणि ते १०व्या क्रमांकावर गेले आहेत.  


 कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ ९ गुणांच्या पिछाडीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया कसोटीत अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलिायने जानेवारी महिन्यात अॅशेस मालिकेत ४-० असा विजय मिळवून मोठी झेप घेतली.  त्यांच्या खात्यात १२८ रेटींग गुण आहेत. त्यापाठोपाठ भारत  ( ११९), न्यूझीलंड  (१११), दक्षिण आफ्रिका ( ११०) व पाकिस्तान ( ९३) यांचा क्रमांक येतो. वन डे क्रिकेटमध्ये न्यूझीलंड १२५ रेटींग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंड  ( १२४) , ऑस्ट्रेलिया ( १०७), भारत ( १०५) व पाकिस्तान ( १०२) हे अव्वल पाचमध्ये आहेत.  
 

Web Title: Team India in Latest ICC Rankings: Rohit Sharma led India retains number 1 Position in ICC Men’s T20 Rankings, Test - 2nd Spot, ODI - 4th Spot  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.