Team India: 'हा' फलंदाज वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी मारू शकतो: सुनील गावस्करांचा मोठा दावा

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या एका खेळाडूचे तोंडभरुन कौतुक केले. हा खेळाडू वनडेत त्रिशतक झळकावू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 07:26 PM2022-12-27T19:26:50+5:302022-12-27T19:27:34+5:30

whatsapp join usJoin us
Team India: Ishan Kishan can hit triple century in ODI cricket: Sunil Gavaskar's big claim | Team India: 'हा' फलंदाज वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी मारू शकतो: सुनील गावस्करांचा मोठा दावा

Team India: 'हा' फलंदाज वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी मारू शकतो: सुनील गावस्करांचा मोठा दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Cricket Team: माजी भारतीय क्रिकेटर आणि कमेंटेटर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. संघातील खेळाडूंचे कौतुक करण्यासोबतच ते अनेकदा टीकाही करतात. आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. त्यांनी टीम इंडियाच्या एका खेळाडूचे नाव घेतले आहे, जो भविष्यात ट्रिपल सेंच्युरी लगावू शकतो. 

हा खेळाडू ट्रिपल सेंच्युरी मारणार
टीम इंडियाचा युवा फलंदाज इशान किशन  (Ishan Kishan) वनडेमध्ये त्रिशतक झळकावू शकतो, असा विश्वास भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला. इशान किशनने नुकतेच बांगलादेश दौऱ्यावर वनडेतील सर्वात जलद द्विशतक झळकावले. अशा परिस्थितीत हा खेळाडू वनडेतही त्रिशतक झळकावू शकतो, असे सुनील गावस्कर यांना वाटते. याचे कारणही त्यांनी सांगितले आहे.

सुनील गावस्करांनी केले कौतुक

सोनी स्पोर्ट्सशी बोलताना सुनील गावसकर म्हणाले, 'जेव्हाही मी तरुण खेळाडूंना खेळताना पाहतो, तेव्हा त्यांच्यामध्ये भारताचे भविष्य दिसते. अलीकडेच ईशान किशनने बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वात जलद द्विशतक झळकावले. त्याची वेगवान फलंदाजी पाहून असे वाटत होते की, ईशानला हवे असते तर त्याच्या बॅटमधून त्रिशतकही निघू शकले असते. त्याच्याकडे सर्व क्षमता आहे, ज्यामुळे तो मैदानावर मोठे फटके मारू शकतो. इतक्या लहान वयात त्याच्या बॅटमधून 200 धावा निघणे ही मोठी कामगिरी होती.'

इशान किशनने दमदार द्विशतक झळकावले
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या वनडेमध्ये इशान किशनने 210 धावांची तुफानी खेळी केली. त्याने 126 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले होते. तर इशान किशनने 131 चेंडूंच्या खेळीत 24 चौकार आणि 10 षटकार ठोकले. इशान किशन आता श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणार्‍या वनडे आणि टी-20 मालिकेत टीम इंडियाचा भाग होऊ शकतो.

Web Title: Team India: Ishan Kishan can hit triple century in ODI cricket: Sunil Gavaskar's big claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.