टीम इंडियाच्या जर्सीमध्ये झाला महत्त्वाचा बदल, नव्या शर्टचा प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान!

Team India Jersey Change, IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध २७ जुलैला ही जर्सी घालून मैदानात उतरणार टीम इंडिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 08:09 PM2024-07-25T20:09:59+5:302024-07-25T20:11:06+5:30

whatsapp join usJoin us
Team India Jersey changed now 2 stars above bcci logo on T20 kit t-shirt as 2 times world champions | टीम इंडियाच्या जर्सीमध्ये झाला महत्त्वाचा बदल, नव्या शर्टचा प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान!

टीम इंडियाच्या जर्सीमध्ये झाला महत्त्वाचा बदल, नव्या शर्टचा प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India Jersey Change, IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेला २७ जुलैपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया आणि त्याच्या चाहत्यांसाठी ही मालिका खूप खास आहे कारण ही मालिका तिचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यकाळाची सुरुवात देखील करेल. नवे मुख्य प्रशिक्षक कोणती रणनीती घेऊन मैदानात उतरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, टीम इंडियासाठी श्रीलंका मालिकाही खास आहे कारण या मालिकेत ब्लू ब्रिगेड नवीन जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. ही जर्सी खूप खास असणार आहे कारण त्यात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

टीम इंडियाची खास जर्सी

टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत खास जर्सी घालून उतरणार आहे. या जर्सीवर बीसीसीआयच्या लोगोसह दोन स्टार असतील, जे केवळ टीम इंडियासाठीच नाही तर चाहत्यांसाठीही खूप खास आहेत. टीम इंडियाच्या जर्सीतील दोन स्टार्स हे टीम इंडिया दोन वेळा टी२० वर्ल्ड चॅम्पियन्स असल्याचे दर्शवत आहेत. २०२४ च्या टी२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये फक्त एकच स्टार होता, पण २९ जूनला पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनल्याने टीम इंडियाच्या जर्सीत आणखी एका स्टारची भर पडली.

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी विश्वचषक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. पण एक खेदाची बाब म्हणजे, या दोघांनीही टी२० क्रिकेटला रामराम ठोकल्याने ते दोघे मात्र दोन स्टार्स असलेली जर्सी घालून मैदानात उतरू शकणार नाहीत.

Web Title: Team India Jersey changed now 2 stars above bcci logo on T20 kit t-shirt as 2 times world champions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.