Join us  

मुंबई विमानतळावरून Team Indiaच्या खेळाडूची किट बॅग गायब; अखेर हरभजन सिंहने मागितली माफी

हरभजनने का मागितली माफी... जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 10:01 PM

Open in App

Team India, Harbhajan Singh Viral Tweet: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या वन डे मालिकेनंतर टीम इंडियाच्या एका खेळाडूला मुंबई विमानतळावर विचित्र अडचणींचा सामना करावा लागला. मालिकेतील शेवटचा सामना खेळून हा खेळाडू दिल्लीहून मुंबईला परतत असताना मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-२ वरून या खेळाडूची किट बॅगच गायब झाली. या खेळाडूने ट्विट करून मदत मागितली. तेव्हा टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंग याने त्याच्या ट्विटला उत्तर देताना माफी मागितली. मात्र हरभजन सिंगने असे का केले ते आम्ही तुम्हाला सांगतो.

'या' खेळाडूचे सामान गायब

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा भाग असलेल्या शार्दुल ठाकूरचे सामान मुंबई विमानतळावरून गायब झाले. शार्दुल ठाकूरने ट्विट केले की, 'एअर इंडिया, मला लगेज बेल्टवर मदत करण्यासाठी कोणाला पाठवू शकता का? माझी किट बॅग वेळेवर न मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. तुमचा एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही.

हरभजन सिंगने का मागितली माफी

आम आदमी पार्टीचा राज्यसभा खासदार आणि माजी क्रिकेटर हरभजन सिंग यापूर्वी एअर इंडियाचा कर्मचारी होता. त्यामुळे त्याने ट्विट करून शार्दुल ठाकूरची माफी मागितली. हरभजन सिंगने ट्विटला उत्तर देताना लिहिले, "शार्दुल, तू काळजी करू नकोस. तुला तुझं सामान नक्की मिळेल. आमचे कर्मचारी तिथे पोहोचतील. आम्ही तुम्हा खेळाडूंवर प्रेम करतो. त्रास झाल्याबद्दल क्षमस्व. (माजी एअरइंडियन - भज्जी)."

--

शार्दुल ठाकूरनेही याला उत्तर देताना लिहिले की, 'भज्जी पाजी, तुझ्यावर प्रेम आहेच, मला दुसऱ्या विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली. माझे सामान मला मिळाले. धन्यवाद.'

टॅग्स :ऑफ द फिल्डहरभजन सिंगशार्दुल ठाकूरभारत
Open in App