आशियाई स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी भारताच्या क्रिकेट संघात २ बदल; BCCI ची अचानक घोषणा

Team India (Men’s and Women’s) Squad Updates for Asian Games 2023 : भारतीय पुरुष व महिला संघ आशियाई स्पर्धा २०२३ ( Asian Games 2023) स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 10:34 PM2023-09-16T22:34:22+5:302023-09-16T22:35:18+5:30

whatsapp join usJoin us
Team India (Men’s and Women’s) Squad Updates- Akash Deep has been named as replacement for Shivam Mavi in Team India's squad for Asian Games 2023. | आशियाई स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी भारताच्या क्रिकेट संघात २ बदल; BCCI ची अचानक घोषणा

आशियाई स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी भारताच्या क्रिकेट संघात २ बदल; BCCI ची अचानक घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India (Men’s and Women’s) Squad Updates for Asian Games 2023 : भारतीय पुरुष व महिला संघ आशियाई स्पर्धा २०२३ ( Asian Games 2023) स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी सज्ज झाला आहे. १९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत हँगझोऊ येथे क्रिकेटच्या स्पर्धा होणार आहेत. भारतीय पुरुष संघ ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली, तर महिला संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली आशियाई स्पर्धेत सहभागी होणार आहे. महिला क्रिकेट स्पर्धा १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत पार पडेल.

पुरुष व महिलांचे क्रिकेट सामने ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये खेळवले जाणार आहेत. पुरुष गटात भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी उपांत्यपूर्व फेरीत आधीच जागा पक्की केली आहे.भारतीय पुरुष संघाचा पहिला सामना ३ ऑक्टोबरला होणार आहे, परंतु त्याआधी संघातील स्टार गोलंदाज शिवम मावी याला दुखापत झाली आहे. शिवमने भारताकडून ६ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. पण, त्याला दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.  त्याच्या जागी RCB चा गोलंदाज आकाश दीपला ( Akash Deep) निवड केली गेली आहे. 

भारतीय पुरुष संघ - ऋतुराज गायकवाड ( कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग, आकाश दीप ( Team India (Senior Men) squad for 19th Asian Games: Ruturaj Gaikwad (Captain), Yashasvi Jaiswal, Rahul Tripathi, Tilak Varma, Rinku Singh, Jitesh Sharma (wk), Washington Sundar, Shahbaz Ahmed, Ravi Bishnoi, Avesh Khan, Arshdeep Singh, Mukesh Kumar, Shivam Dube, Prabhsimran Singh (wk), Akash Deep.) Standby list of players: Yash Thakur, Sai Kishore, Venkatesh Iyer, Deepak Hooda, Sai Sudarsan.
दरम्यान महिला संघातही बदल केला गेला आहे. पूजा वस्त्राकर जिला राखीव खेळाडू म्हणून निवडले गेले होते, ती अंजली सर्वाणीच्या जागी मुख्य संघात खेळेल. अंजलीच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि तिला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. 


भारताचा महिला संघ - हरमनप्रीत कौर ( कर्णधार, स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रीग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष, अमनजोत कौर, देविका वैद्य, तितास सधू, राजेश्वरी गायकवाड, मिनू मनी, कनिका अहुजा, उमा चेत्री, अनुषा बरेड्डी, पूजा वस्त्राकर ( Team India (Senior Women) squad for 19th Asian Games: Harmanpreet Kaur (Captain), Smriti Mandhana (VC), Shafali Verma, Jemimah Rodrigues, Deepti Sharma, Richa Ghosh (wk), Amanjot Kaur, Devika Vaidya, Titas Sadhu, Rajeshwari Gayakwad, Minnu Mani, Kanika Ahuja, Uma Chetry (wk), Anusha Bareddy, Pooja Vastrakar. Standby list of players: Harleen Deol, Kashvee Gautam, Sneh Rana, Saika Ishaque.) 

Web Title: Team India (Men’s and Women’s) Squad Updates- Akash Deep has been named as replacement for Shivam Mavi in Team India's squad for Asian Games 2023.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.