विंडिजमध्ये 1997 मध्ये झाली होती भारताची फजिती! आता लक्षात ठेवाव्या लागणार 'या' 5 गोष्टी

भारत-वेस्ट इंडिज पहिली कसोटी आजपासून रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 12:27 PM2023-07-12T12:27:49+5:302023-07-12T12:30:40+5:30

whatsapp join usJoin us
Team India need to learn from their mistakes in 1997 tour of West Indies under Rohit Sharma captaincy | विंडिजमध्ये 1997 मध्ये झाली होती भारताची फजिती! आता लक्षात ठेवाव्या लागणार 'या' 5 गोष्टी

विंडिजमध्ये 1997 मध्ये झाली होती भारताची फजिती! आता लक्षात ठेवाव्या लागणार 'या' 5 गोष्टी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs WI, Rohit Sharma Team India: टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिजपेक्षा मजबूत दिसत आहे. टीम इंडियाकडे चांगले फलंदाज आहेत. पण असे असले तरी वेस्ट इंडिजचे जुने दौरे पाहिले तर अनेक वेळा टीम इंडियाची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली आहे. 1997 मध्ये भारतीय संघात अनेक धुरंधर फलंदाज होते, पण तरीही अवस्था बिकट होती. तसेच आता घडू नये यासाठी टीम इंडियाला पाच महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात.

1997 मध्ये काय घडलं?

1997 मध्ये ब्रिजटाऊन येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी खेळली गेली. तेव्हाही टीम इंडियाची बॅटिंग लाईनअप खूप मजबूत होती. टीम इंडियाला चौथ्या डावात केवळ 120 धावा करण्याचे लक्ष्य मिळाले. पण त्यानंतर टीम इंडिया अवघ्या 81 धावांवर आटोपली. त्यावेळी टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण, नवज्योत सिद्धू, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, मोहम्मद अझरुद्दीन हे खेळाडू होते. म्हणजेच फलंदाजीचा क्रम उत्कृष्ट होता. त्यामुळे यावेळी टीम इंडियाच्या फलंदाजांना जर यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी पाच मुद्दे लक्षात ठेवायलाच हवेत.

या 5 गोष्टी महत्त्वाच्या-

1. संयम बाळगणे खूप महत्वाचे आहे. विंडीजच्या खेळपट्टीवर खेळताना आणि विशेषतः फलंदाजी करताना संयम बाळगावा लागतो. अजिंक्य रहाणेनेही रोहित शर्माच्या एका व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे. कारण नजरेला चेंडूची सवय झाली आणि खेळपट्टीवर स्थिरावता आले तर वेस्ट इंडिजमध्ये धावा करणे खूप सोपे असते.

2. उशिराने शॉट खेळणे फायद्याचे आहे. टीम इंडियाला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडकडून वेस्ट इंडिजमध्ये खेळण्याचा हा धडा घेता येईल. राहुल द्रविड त्याच्या कारकिर्दीत खूप उशिरा चेंडू खेळायचा. त्याचा फायदा त्याला परदेशी दौऱ्यात खेळताना मिळाला.

3. ऑफ स्टंप बॉल खेळताना काळजी घ्यावी. ऑफ स्टंप बॉल खेळताना कोणता सोडायचा, कोणता खेळायचा. याबाबत टीम इंडियाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. विराट कोहली अलीकडे या समस्येशी झुंजताना दिसत आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला विंडीजच्या वेगवान गोलंदाजांसमोर टिकून राहावे लागणार आहे. टॉप ऑर्डरला नवीन चेंडूबाबत खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

4. समोर फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. टीम इंडियाच्या फलंदाजाने 'V' मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तर बरे होईल. V च्या एरियात म्हणजे मिड ऑफ आणि मिड ऑनमध्ये खेळावे लागेल. त्याचबरोबर टीम इंडियाच्या फलंदाजांना 'क्रॉस द लाइन' खेळणे टाळावे लागणार आहे.

5. चांगली सलामी मिळणे आवश्यक आहे. शुभमन गिल आणि रोहित शर्मा टीम इंडियासाठी सलामी देतील. अशा स्थितीत टीम इंडियाला या दोघांकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा असेल.

Web Title: Team India need to learn from their mistakes in 1997 tour of West Indies under Rohit Sharma captaincy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.