Team India New Jersey, T20 World Cup: आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली. आशिया चषक २०२२ स्पर्धेतील कामगिरीनंतर T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण, दुखापतग्रस्त रवींद्र जाडेजा व जलदगती गोलंदाज आवेश खान वगळता फार बदल दिसला नाही. जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल हे दुखापतीतून सावरून संघात परतले आहेत. या दोघांच्या अनुपस्थितीत भारताच्या गोलंदाजीतील उणीवा प्रकर्षाने जाणवल्या, परंतु आता संघ मजबूत वाटतोय. संघात बदल नसला तरी खेळाडूंच्या कपड्यांबाबत एक नवा बदल दिसणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी सप्राईज म्हणजेच मागच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ रेट्रो जर्सीत मैदानावर उतरला होता. तसेच आता या वर्ल्ड कपसाठी पुन्हा एकदा भारतीय संघ नवीन जर्सी परिधान करणार आहे. MPL हे टीम इंडियाच्या अधिकृत जर्सीसाठीच्या प्रायोजकांनी एक प्रोमो पोस्ट केला होतो. त्यानंतर आज त्यांनी नव्या जर्सीचे अनावरण केले. पाहा त्याचा लूक-
भारताच्या वर्ल्ड कप संघात जसप्रीत, हर्षल, भुवनेश्वर कुमार व अर्शदीप सिंग हे चार जलदगती गोलंदाज आहेत. भुवीचे संघात असणे अपेक्षित होतेच, अर्शदीपने कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड कप संघात स्थान पटकावले. हार्दिक पांड्या हा पाचव्या जलदगती गोंदाजाची उणीव भरून काढण्यासाठी सज्ज आहेच. मोहम्मद शमी संघात परतला आहे, परंतु त्याची राखीव खेळाडूंमध्ये निवड केली गेली आहे.
भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग
राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर
Web Title: Team India New Jersey Launched for T20 World Cup see photos most awaited look is here by BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.