टीम इंडियाने घातली ‘आर्मी कॅप, सामना शुल्क राष्ट्रीय संरक्षण निधीला भेट

टीम इंडियाने शुक्रवारी येथे ऑस्ट्रियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यामध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 04:38 AM2019-03-09T04:38:48+5:302019-03-09T04:39:53+5:30

whatsapp join usJoin us
Team India organized 'Army cap', match fee to National Defense Fund | टीम इंडियाने घातली ‘आर्मी कॅप, सामना शुल्क राष्ट्रीय संरक्षण निधीला भेट

टीम इंडियाने घातली ‘आर्मी कॅप, सामना शुल्क राष्ट्रीय संरक्षण निधीला भेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रांची : टीम इंडियाने शुक्रवारी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यामध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. संघातील सर्व खेळाडू ‘आर्मी कॅप’ घालून सामना खेळले. याशिवाय सामन्यातून मिळणारी रक्कमदेखील राष्ट्रीय संरक्षण निधीला भेट दिली. वन-डेत खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आठ लाख आणि राखीव खेळाडूला प्रत्येकी चार लाख रुपये मिळतात.
सामना सुरू होण्याआधी सेनेची मानद लेफ्टनंट कर्नलही रँक असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने या कॅपचे खेळाडूंना वाटप केले. यानंतर कर्णधार विराट कोहली नाणेफेकीला आला. त्यावेळी त्याच्या या कॅपवर बीसीसीआयचा लोगो होता. खेळाडूंनी सर्व उपस्थितांनादेखील राष्ट्रीय संरक्षण निधीला योगदान देण्याचे आवाहन केले.
भारतीयांनी शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि नातेवाइकांसाठी मदतनिधीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात देणगी द्यावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. 

Web Title: Team India organized 'Army cap', match fee to National Defense Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.