Join us  

IND VS WI 3rd ODI: टीम इंडिया तिसऱ्या वन डे सामन्यात करणार ४ बदल; जाणून घ्या कोणाला मिळणार संधी, कोण होणार बाहेर?

भारताने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत आधीच २-०ने आघाडीवर; शुक्रवारी होणार तिसरा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 4:34 PM

Open in App

IND vs WI 3rd ODI: टीम इंडियाने (Team India) पहिल्या दोन वन डे सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करून मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिला सामना ६ गडी राखून जिंकला होता, तर दुसरा सामना ४४ धावांनी जिंकला. आता या मालिकेतील शेवटचा सामना शुक्रवारी होणार असून त्यात भारतीय संघ बदलांसह उतरू शकतो. टीम इंडियामध्ये किमान चार बदल होऊ शकतात, असं मानलं जात आहे. दुसऱ्या वनडेतील विजयानंतर स्वतः कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) याचे संकेत दिले आहेत. रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितले की, तिसऱ्या वनडेत शिखर धवनला संधी देण्यात येणार आहे. धवनला वन डे मालिकेपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो पहिल्या दोन सामन्यांना मुकला. त्याच्याबरोबर ऋतुराज गायकवाड आणि नवदीप सैनी यांनाही कोविड झाला होता. पण आता सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवनचा संघातील समावेश जवळपास निश्चित आहे. याचाच अर्थ भारत पुन्हा एकदा बदललेल्या सलामी जोडीसह मैदानात उतरेल. दुसऱ्या वनडे मध्ये पंत आणि रोहित सलामीला आले होते. आता धवन आला तर तो आणि रोहित सलामीला उतरतील. पंत पुन्हा एकदा मधल्या फळीत खेळेल. अशा परिस्थितीत मधल्या फळीतील दीपक हुडाला संघाबाहेर बसवण्याचा निर्णय होऊ शकतो.

गोलंदाजांच्या फळीत तीन बदल?

तिसऱ्या वनडेमध्ये गोलंदाजी पूर्णपणे वेगळी दिसू शकते. शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला संधी मिळू शकते. त्याने आफ्रिकेत गोलंदाजी आणि फलंदाजीत चांगली कामगिरी केली होती. त्याशिवाय मोहम्मद सिराजला विश्रांती देऊन आवेश खानला पदार्पणाची संधी मिळू शकते. तर स्पिन गोलंदाजीत युजवेंद्र चहलला बाहेर बसवून कुलदीप यादवला संधी देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशिखर धवनकुलदीप यादवआवेश खान
Open in App