Join us  

टीम इंडिया मे २०२२ पर्यंत नॉन स्टॉप खेळणार; जाणून घ्या कोणा कोणाला भिडणार

इंडियन प्रीमिअर लीग २०२१चा दुसरा टप्पा उद्यापासून यूएईत सुरू होत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पहिला सामना होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 11:39 AM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२१चा दुसरा टप्पा उद्यापासून यूएईत सुरू होत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पहिला सामना होणार आहे. IPL 2021च्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ही स्पर्धा स्थगित करावी लागली होती आणि आता उर्वरित ३१ सामने यूएईत खेळवण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबरला फायनल सामना होणार आहे आणि त्यानंतर लगेच दोन दिवसांनी म्हणजे १७ ऑक्टोबरपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला मुकाबला २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार असला तरी खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. हे असे चर्च मे २०२२पर्यंत सुरू असणार आहे. 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंडचा संघ भारतात दोन कसोटी व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ३ वन डे, ३ कसोटी व ४ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. तिथून पुन्हा मायदेशात टीम इंडिया ३ ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला भिडतील. या मालिकेतील एक कसोटी सामना मुंबईत होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धचे दोन कसोटी सामने लखनौ व बंगळुरू येथे खेळवण्यात येतील. २८ वर्षांनंतर लखनौ येथे कसोटी सामना होणार आहे. १९९४मध्ये  श्रीलंकेचा संघ येथे कसोटी सामना खेळला होता. ( Lucknow and Bengaluru to host the two-match Test series between India and New Zealand in November.)

क्रिकेट नॉन स्टॉप

  • IPL 2021
  • T20 World Cup
  • 2 Test vs New Zealand
  • 3 T20 vs New Zealand
  • 3 Test vs South Africa
  • 3 ODI vs South Africa
  • 4 T20 vs South Africa
  • 3 T20 vs Sri Lanka
  • 2 Test vs Sri Lanka
  • IPL 2022

 

दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रककसोटी मालिका

  1. पहिली कसोटी - १७ डिसेंबर, जोहान्सबर्ग
  2. दुसरी कसोटी - २६ डिसेंबर, सेंच्युरियन
  3. तिसरी कसोटी - ३ जानेवारी २०२२, जोहान्सबर्ग

 

  • वन डे मालिका - ११, १४ व  १६ जानेवारी २०२२
  • ट्वेंटी-२० मालिका - १९, २१, २३ व २६ जानेवारी, २०२२

 

त्यानंतर जुलै महिन्यात इंग्लंड दौराट्वेंटी-२० मालिका१ जुलै २०२२ - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर३ जुलै २०२२ - ट्रेंट ब्रिज, नॉटिंग्हॅम६ जुलै २०२२ - एजीस बाऊल, साऊदहॅम्प्टन वन डे मालिका  ९ जुलै २०२२ - एडबस्टन, बर्मिंगहॅम१२ जुलै २०२२ - ओव्हल, लंडन१४ जुलै २०२२ - लॉर्ड्स, लंडन 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध न्यूझीलंडभारत विरुद्ध इंग्लंडभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारत विरुद्ध श्रीलंकाट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१आयपीएल २०२१
Open in App