३.५ कोटी...! मराठमोळ्या रहाणेची नवीन खरेदी; अजिंक्यच्या घरी आली रूबाबदार गाडी

Ajinkya Rahane Car: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने नवीन खरेदी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 03:38 PM2024-02-21T15:38:50+5:302024-02-21T15:58:11+5:30

whatsapp join usJoin us
Team India player Ajinkya Rahane has bought a Mercedes-Benz Maybach GLS 600 worth Rs 3.5 crore | ३.५ कोटी...! मराठमोळ्या रहाणेची नवीन खरेदी; अजिंक्यच्या घरी आली रूबाबदार गाडी

३.५ कोटी...! मराठमोळ्या रहाणेची नवीन खरेदी; अजिंक्यच्या घरी आली रूबाबदार गाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने नवीन खरेदी केली आहे. रहाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असून रणजी ट्रॉफी खेळत आहे. तो आता थेट आयपीएलमध्ये दिसेल. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून खेळताना गतवर्षी त्याने चमकदार कामगिरी केली होती. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीमुळे रहाणेला भारतीय संघाचे तिकिट मिळाले होते. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात तो टीम इंडियाचा भाग होता. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करून रहाणेने भारतीय चाहत्यांना सुखद धक्का देण्याचा प्रयत्न केला. पण भारताला तो सामना मोठ्या फरकाने गमवावा लागला. 

येत्या काही महिन्यांत आयपीएलचा सतरावा हंगाम सुरू होणार आहे. अशातच रहाणेने एक नवीन लक्झरी SUV Mercedes Maybach GLS600 खरेदी केली आहे, या गाडीची किंमत ३.५ कोटी रुपये आहे. Mercedes Maybach GLS600 ही भारतातील सेलिब्रिटी आणि उद्योगपतींची आवडती SUV मानली जाते.

अजिंक्य रहाणेची नवीन खरेदी
बॉलिवूड कलाकार अर्जुन कपूर, रणवीर सिंग, रकुल प्रीत सिंग, तापसी पन्नू, राम चरण, क्रिती सेनॉन आणि आयुष्मान खुराना यांसारख्या कलाकारांसोबत, असे अनेक उद्योगपती आहेत ज्यांना मर्सिडीज मेबॅक जीएलएस ६०० ने भुरळ घातली. अजिंक्य रहाणेच्या नवीन मर्सिडीज मेबॅच GLS600 बद्दल भाष्य करायचे झाले तर, या लक्झरी SUV मध्ये ४.० लिटर बायटर्बो वी ८ इंजिन आहे, जे ४८ व्होल्ट इलेक्ट्रिक सिस्टम तसेच EQ फंक्शनने सुसज्ज आहे. हे इंजिन ५५७ एचपीची कमाल पॉवर आणि ७३० न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते.  

Mercedes-Benz Maybach GLS 600 या गाडीची किंमत ३.५ कोटी रुपये एवढी आहे. ही गाडी कंपनीची भारतातील प्रमुख SUV आहे, या आलिशान गाडीची किंमतही तेवढीच मोठी आहे. या लक्झरी कारमध्ये 4.0 लीटर V8 ट्विन टर्बो इंजिन आहे, जे 550 hp ची पॉवर आणि 730 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. 

Web Title: Team India player Ajinkya Rahane has bought a Mercedes-Benz Maybach GLS 600 worth Rs 3.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.