भुवनेश्वर कुमारचं सरप्राईज अन् पत्नीचा आनंद गगनात मावेना; नुपूरला विश्वासही बसेना, Video

भुवनेश्वर कुमार मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 07:46 PM2024-08-17T19:46:32+5:302024-08-17T19:46:52+5:30

whatsapp join usJoin us
Team India player Bhuvneshwar Kumar surprised wife Nupur Nagar on her birthday  | भुवनेश्वर कुमारचं सरप्राईज अन् पत्नीचा आनंद गगनात मावेना; नुपूरला विश्वासही बसेना, Video

भुवनेश्वर कुमारचं सरप्राईज अन् पत्नीचा आनंद गगनात मावेना; नुपूरला विश्वासही बसेना, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

bhuvneshwar kumar news : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. तो सध्या केवळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसतो. १५ ऑगस्ट रोजी आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भुवीने जबरदस्त सरप्राईज दिले. पतीचे हे सरप्राईज पाहून भुवीची पत्नी नुपूर नागरही अवाक् झाली. भुवनेश्वर आणि नुपूरचे डिसेंबर २०१७ मध्ये लग्न झाले. या दोघांना एक मुलगी आहे. पतीने दिलेल्या सरप्राईजची झलक नुपूरने शेअर केली आहे. 

नुपूर नागरने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले की, पुन्हा एकदा भुवी मला वाढदिवसाच्या दिवशी सरप्राईज देण्यात अयशस्वी ठरला नाही. त्याने दिलेल्या या शुभेच्छा मी कायम लक्षात ठेवीन आणि आठवणीत जपत राहीन. ही अशी अद्भुत मजेदार रात्र बनवल्याबद्दल सर्वांचे आभार. मला दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार. 


दरम्यान, आयपीएल २०२५ पूर्वी लखनौ फाल्कन्सने यूपी टी-२० लीगच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी भुवनेश्वर कुमारला आपल्या संघाचा भाग बनवले. खरे तर यूपी टी-२० चा पहिला हंगाम भुवीसाठी खूप चांगला राहिला होता. त्याने आपल्या गोलंदाजीने अप्रतिम कामगिरी करून सर्वांची मने जिंकण्यात यश मिळवले. अशा स्थितीत लखनौच्या फ्रँचायझीने दुसऱ्या हंगामासाठी सर्वाधिक ३० लाख रुपयांची बोली लावून भुवीला आपल्या संघाचा भाग बनवले आहे. भुवी नोएडा सुपर किंग्जकडून शेवटचा हंगाम खेळला होता. यूपी टी-२० लीग २०२३ मध्ये भुवनेश्वर कुमार नोएडा सुपर किंग्जसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. याशिवाय पदार्पणाच्या हंगामात सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत भुवीने चौथ्या क्रमांकावर कब्जा केला होता. मागील हंगामात त्याने ९ सामन्यांमध्ये १४ बळी घेतले होते. 

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने प्रभावी कामगिरी केली. भुवीने आयपीएल २०२४ मध्ये खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये ९.३५ च्या सरासरीने गोलंदाजी करून ११ बळी घेतले आहेत. त्याने टीम इंडियासाठी त्याने २१ कसोटी सामने खेळले असून ६३ बळी पटकावले आहेत. याशिवाय १२१ वन डे सामने खेळणाऱ्या भुवीने १४१ बळी घेतले आहेत. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अर्थात ट्वेंटी-२० मध्ये त्याच्या नावावर ८७ सामन्यांमध्ये ९० बळींची नोंद आहे.

Web Title: Team India player Bhuvneshwar Kumar surprised wife Nupur Nagar on her birthday 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.