Mohammed Shami Sania Mirza Marriage : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि टेनिस स्टार सानिया मिर्झालग्न करणार असल्याची चर्चा रंगली असतानाच शमीने त्यावर भाष्य केले. (mohammed shami latest news) खरे तर अनेकांनी सानिया आणि शमी यांचे फोटो एडिट करून व्हायरल केले होते. यावर सानियाच्या वडिलांनीही प्रतिक्रिया दिली होती. (mohammed shami marriage) आता खुद्द शमीने याबद्दल भाष्य करताना संतप्त प्रतिक्रिया दिली. मीम्स बनवणाऱ्या मंडळींनी जर विचार करायला हवा. एखाद्याच्या जीवनावर याचा किती परिणाम होऊ शकतो याची कल्पना त्यांना नसते, असे शमीने सांगितले. (mohammed shami marriage news)
एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मोहम्मद शमीने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तो म्हणाला की, हे मीम्स कोणाच्या तरी वैयक्तिक आयुष्याशी निगडीत असू शकतात, त्यामुळे व्हायरल करणाऱ्यांनी ते विचारपूर्वक करावेत. ज्यांचे पेज व्हेरिफाय केलेले नाहीत ते लोक असे बोलू शकतात. मी आव्हान देतो की, त्यांच्यात हिंमत असेल तर एक व्हेरिफाईड पेज बनवा आणि असे फोटो शेअर करून दाखवा. दुसऱ्या व्यक्तीला खड्ड्यात ढकलणे सोपे असते, पण असे न करता त्या लोकांनी स्वत: यश मिळवण्याचा विचार केला पाहिजे. या लोकांना इतरांचे पाय खेचण्यात खूप आनंद वाटतो. पण, मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा आधार बनून चार लोकांचे चांगले भविष्य करावे. जर तुम्ही दुसऱ्याला मदत केलीत तर तुम्ही एक चांगला माणूस आहात हे मी स्वीकारेन.
वन डे विश्वचषक २०२३ मध्ये मोहम्मद शमीने शानदार कामगिरी करताना सर्वाधिक बळी घेतले. सानिया मिर्झा मागील काही कालावधीपासून खूप चर्चेत आहे. तिचा माजी पती शोएब मलिकने पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री सना जावेदशी विवाहगाठ बांधली. शोएबने तिसऱ्यांदा तर सनाने दुसऱ्यांदा लग्न केले. मात्र, सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी हे लग्न करणार असल्याची चर्चा रंगली असताना सानियाचे वडील इमरान मिर्झा यांनी ही चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचे म्हटले होते. इमरान मिर्झा म्हणाले होते की, हे सर्वकाही खोटे आहे, सानिया शमीला कधी भेटली देखील नाही.
दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. त्याचे हे तिसरे लग्न आहे. २०१० मध्ये सानिया आणि शोएबचे लग्न झाले होते. या दोघांचे नाते सुमारे १४ वर्ष टिकले. शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दोन वर्षांपासून हळूहळू दुरावा येण्यास सुरूवात झाल्याच्या चर्चा होत्या. एका मॉडेलसोबतचे स्विमिंग पूल मधील इंटिमेट फोटोशूट याला कारणीभूत ठरले होते. त्यानंतर सानिया-शोएब वेगळे होणार अशी सातत्याने चर्चा होती. त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला.