वन डे विश्वचषक गाजवणारा मोहम्मद शमी अद्याप प्रसिद्धीच्या झोतात कायम आहे. शमीने मिळालेल्या संधीचे सोने करताना भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. खरं तर शमी त्याच्या जबरदस्त फॉर्ममुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. मोहम्मद शमीसोबत त्याची विभक्त पत्नी हसीन जहाँ देखील सातत्याने टिप्पणी करून प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. खासकरून विश्वचषकातील शमीच्या अप्रतिम कामगिरीनंतर ती सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाली.
हसीन जहाँ नेहमी नवनवीन फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. आता तिने घटस्फोट आणि रिलेशनशिपमध्ये वेगळे होण्यावर तिचे मत मांडले आहे. या पोस्टद्वारे हसीन जहाँने नाव न घेता शमीचा खरपूस समाचार घेतला. हसीन जहाँने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये घटस्फोट किंवा विभक्त होण्याच्या बाबतीत महिलांची भूमिका काय असावी यावर एक महिला भाष्य करत आहे. हसीन जहाँने हा व्हिडीओ शेअर केला असून मी देखील प्रत्येक महिलेला हाच सल्ला देते असे म्हटले.
"मी सर्व महिलांना स्वतःची लढाई लढायला सांगते... धीर धरा, थोडेफार सहन करा, परंतु अल्लाह सोडून इतर कोणत्याही माणसासमोर रडू नका. हा समाज महिलांसाठी खूप गलिच्छ आहे. याच परिस्थितीचा सामना करत असलेल्या अशा दोन महिलांचे मी प्राण वाचवले आहेत. दोन महिलांची इज्जत लुटल्यानंतर ते दोन पुरुष निघून जात होते, त्यानंतर मी दोघांचे लग्न लावले आणि आज त्यांचा चांगला संसार असून मुलेही आहेत.
शमी आणि हसीन जहाँ यांचा वाद भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे फार चर्चेत असतो. शमी आणि त्याच्या पत्नीत वाद असून ते दोघे २०१८ मध्ये विभक्त झाले. हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार आणि मारहाणीचे आरोप केले होते. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून दोघांना एक मुलगी देखील आहे. शमी आणि हसीन जहाँचा घटस्फोटाचा खटला कोर्टात सुरू आहे.