T20 World Cup 2024, Rishabh Pant : भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकात व्यग्र आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारतीय संघाने विजयाच्या हॅटट्रिकसह सुपर-८ मध्ये जागा मिळवली. साखळी फेरीतील सामन्यांमध्ये भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने चांगली कामगिरी केली. खासकरून पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने यष्टीरक्षक म्हणून तीन झेल टिपले. आता पंतने दाखवलेल्या मनाच्या मोठेपणामुळे तो चर्चेत आहे. भारतीय शिलेदाराच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
काही दिवसांपूर्वी १८ मे रोजी रिषभ पंतने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युट्यूबवर त्याचा एक चॅनेल उघडला होता. त्यावर केवळ सात व्हिडीओ अपलोड करण्यात आल्या आहेत. पण, या चॅनेलचे एक लाख सब्सक्राइबर्स आहेत. त्यामुळे युट्यूबकडून पंतला सिल्वर प्ले बटन देण्यात आले. पंतने या बटणासोबत एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने स्पष्ट केले की, यातून होणारी कमाई, स्वत:च्या कमाईतील काही योगदान तो दान करणार आहे.
रिषभची मोठी घोषणा
रिषभने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, हे सिल्वर बटन आपल्या सर्वांचे आहे. एक लाख सब्सक्राइबर्स झाले आहेत आणि आणखी काही जोडले जात आहेत. म्हणूनच मी YouTube वरून होणारी सर्व कमाई, माझ्या स्वत:च्या कमाईतील काही योगदानासह, एका चांगल्या कारणासाठी दान करण्याचे वचन देत आहे. या प्लॅटफॉर्मचा उपयोग आपण सुधारणा आणि काहीतरी बदल आणण्यासाठी करूया.
ट्वेंटी-२० विश्वचषकातील पंतची कामगिरी -
- सराव सामना - बांगलादेशविरूद्ध ५३ धावा
- पहिला सामना - आयर्लंडविरूद्ध नाबाद ३६ धावा
- दुसरा सामना - पाकिस्तानविरूद्ध ४२ धावा
- तिसरा सामना - अमेरिकेविरूद्ध १८ धावा
- चौथा सामना - पावसामुळे रद्द
Web Title: team india player Rishabh Pant will donate all the earnings from YouTube for a good cause, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.