Join us  

ही दोस्ती कधीच 'तुटणार' नाही! ऋतुराजच्या वाढदिवशी पत्नी उत्कर्षाच्या 'लय भारी' शुभेच्छा

Utkarsha Pawar Birthday Wish To Ruturaj Gaikwad: ऋतुराज आज त्याचा २७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 2:10 PM

Open in App

भारतीय संघाचा खेळाडू ऋतुराज गायकवाड आज त्याचा २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. मराठमोळ्या खेळाडूला चाहते आज त्याच्या खास दिवशी शुभेच्छा देत आहेत. ऋतुराज गायकवाड सध्या क्रिकेटपासून दूर आहे. अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. (Ruturaj Gaikwad Birthday) ऋतुराजला त्याची पत्नी उत्कर्षा पवारने वाढदिवशी खास शुभेच्छा दिल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कर्षा महाराष्ट्राच्या संघाकडून खेळते.

मागील वर्षी ऋतुराज आणि उत्कर्षा विवाहबंधनात अडकले. ३ जून २०२३ रोजी त्यांनी लग्न केले. गायकवाड त्यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग होता, पण त्याने लग्नासाठी संघातून आपले नाव मागे घेतले होते. २४ वर्षीय उत्कर्षा आणि ऋतुराज यांनी प्रेमविवाह केला आहे. लग्नाआधी आयपीएल २०२३ च्या फायनलदरम्यान दोघांचे फोटोही व्हायरल झाले होते.

पतीच्या वाढदिवशी उत्कर्षाने हटके पोस्ट करताना म्हटले, "मैत्री जी कधीच मरत (तुटणार) नाही... आजही मनाने लहान असलेल्या माझ्या खास व्यक्तीला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा." 

मागील वर्षाच्या अखेरीस झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ऋतुराजने चमकदार कामगिरी केली होती. वन डे विश्वचषकातील पराभवानंतर भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळली. या मालिकेत ऋतुराजने सर्वाधिक धावा करण्याची किमया साधली. त्याने ५५.२७ च्या सरासरीने २२३ धावा कुटल्या, याशिवाय तिसऱ्या सामन्यात ५७ चेंडूत १२३ धावांची नाबाद शतकी खेळी केली. 

टॅग्स :ऋतुराज गायकवाडभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्ड