IND vs ENG 2ND Test : भारत-इंग्लंड या दोन संघांमध्ये २ फेब्रुवारीपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. इंग्लडने पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा पराभव केला होता आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विशाखापट्टनम येथील डॉ.वाय.एस.जयशंकर क्रिकेट स्टेडिअमवर ही कसोटी रंगणार आहे. या कसोटीपूर्वी लोकेश राहुल व रवींद्र जडेजा यांना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. प्रमुख फलंदाज विराट कोहली आधीच वैयक्तिक कारणास्तव संघाबाहेर आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हन कशी असेल याची सर्वांना उत्सुकता आहे. पण, हा कसोटी सामना वेगळ्या कारणाने चर्चेत येणार आहे.
मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी मोहम्मद शमी खेळणार नसल्याची माहिती समोर आली होती. शिवाय काही वैयक्तिक कारणास्तव विराट कोहलीही दोन कसोटी सामने खेळणार नाही. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मासह टीम इंडियाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. विराटच्या जागी संघात रजत पाटीदार याचा समावेश केला गेला आहे आणि आता सर्फराज खान याचीही निवड झाली आहे.
दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला चार दिग्गजांशिवाय खेळावा लागणार आहे. १२ वर्ष व तीन महिन्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रथमच विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा किंवा अजिंक्य रहाणे यापैकी एकही खेळाडू नसल्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. या चौघांशिवाय आर अश्विन हा भारतीय कसोटी संघाचा सदस्य राहिला आहे. विराट व जडेजा हे प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्याची ही घरच्या मैदानावरील पहिलीच कसोटी आहे.
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया :
रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.
Web Title: Team india playing second test match in visakhapatnam without cricketer virat kohli mohammed shami ravindra jadeja and kl rahul
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.