Join us  

खांद्याला बॅग, डोक्यावर सुटकेस; दक्षिण आफ्रिकेत पोहोचताच भारतीय खेळाडूंची धावाधाव; Video 

भारतीय संघ ट्वेंटी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. भारत ते  आफ्रिका या प्रवासादरम्यानचा एक गमतीशीर व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 4:09 PM

Open in App

India vs South Africa T20 Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये १० डिसेंबरपासून  ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कालच आफ्रिकेत दाखल झाला... आफ्रिकेतही भारतीय खेळाडूंचे पारंपरिक पद्धतीने स्वागत झाले, परंतु विमानतळावर भारतीय खेळाडू खांद्याला बॅग व डोक्यावर ट्रॉलीबॅग घेऊन पळताना दिसले. बीसीसीआयने पोस्ट केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. 

ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर लोळवून भारतीय संघ आफ्रिकेत ३ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळण्यासाठी दाखल झाला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत एकूण २४ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत आणि त्यापैकी टीम इंडियाने १३ सामने जिंकले आहेत, तर १०मध्ये हार झाली आहे. आगामी ट्वेंटी-२० मालिकेत या दोन संघांमधील कडवी झुंज लक्षवेधी ठरणार आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या या युवा टीमकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. 

या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ आफ्रिकेला रवाना झाला, त्या क्षणापासून ते आफ्रिकेत दाखल होईपर्यंतच्या प्रवासाचे चित्रण करून BCCIने व्हिडीओ शेअर केला. ज्यावेळी भारतीय संघ आफ्रिकेत पोहोचला तेव्हा तिथे पाऊस पडत होता. अशावेळी पावसात भिजण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी भारतीय खेळाडू धावताना दिसत आहेत. आफ्रिकेच्या विमानतळावर उतरल्यावर बसमध्ये जाण्यासाठी ते डोक्यावर बॅग घेवून पळत होते. 

येथे पाहा व्हिडीओ :

भारताचा वन डे संघ -

लोकेश राहुल (कर्णधार), युझवेंद्र चहल, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजित पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर. 

भारताचा ट्वेंटी-२० संघ - 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेट