एकदिवसीय आणि टी-२० प्रकारात भारतीय संघाच्या कर्णधारपदाबाबत नवीन धक्कादायक खुलासा झाला आहे. वृत्तानुसार, ‘रोहित शर्माला टी-२० संघाचा कर्णधार बनविण्यात आले, तेव्हा त्याला वनडे संघाचाही कर्णधार बनायचे होते.’
वनडे संघाच्या कर्णधारपदावरून विराटची हकालपट्टी करण्यात आली. कोहलीने त्याआधी टी-२०चे कर्णधारपद सोडले. क्रिकबझ प्लसच्या वृत्तानुसार, रोहित केवळ टी-२०कर्णधारपदासाठी तयार नव्हता. ‘टी-२० सोबत वनडेचे कर्णधार बनवले, तर नेतृत्वाची भूमिका स्वीकारेन’, अशी अट रोहितने निवड समितीसमोर ठेवली.
माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्याशी त्यांचे मतभेद आहेत का? असे विचारले असता, श्रीधर म्हणाले, ‘सर्वोत्तम निकालासाठी मतभेद महत्त्वाचे आहेत. मी, शास्त्री, भरत सर किंवा आधी संजय बांगर व नंतर विक्रम राठोड यांच्यात मतभेद असायचे. पण आम्ही सर्व एकाच ध्येयासाठी काम करत होतो.
मतभेद होते पण मनभेद नव्हते : श्रीधर
टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी संघासोबत ७ वर्षे घालवली. त्यांनी आपले अनुभव चाहत्यांसोबत शेअर केले. श्रीधर यांनी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये घालवलेली ही वर्षे त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, ‘प्रशिक्षणादरम्यान संघाची खराब कामगिरी ही खरंतर प्रशिक्षणासाठी संधी असते.
प्रशिक्षणाच्या संधींचा अर्थ म्हणजे खेळाडूंना समजून घेणे, त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करणे, त्यांना गरज असेल तेव्हा त्यांना तांत्रिक आणि मानसिक प्रशिक्षण देण्याची संधी देणे. यावरून खेळाडू आणि संघाची कल्पना येते. मुख्यतः वाईट दिवसातील तुमचे वागणे तुमचे व्यक्तिमत्व सांगते.’
Web Title: team india Rohit sharma wanted ODI captaincy along with T20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.