मुंबई - भारतीय क्रिकेट संघ सातत्याने मर्यादित षटकांच्या मालिका खेळत आहे. आता वेस्ट इंडीजचा दौरा आटोपल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. झिम्बाब्वेत होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अन्य काही सिनियर्स खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर काही नव्या युवा चेहऱ्यांना भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आलं आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये दुखापतीतून सावरलेल्या दीपक चहरचं पुनरागमन झालं आहे. ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर यांचा समावेश आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवस सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्ट, दुसरा सामना २० ऑगस्ट आणि तिसरा सामना २२ ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. हे तिन्ही सामने हरारेमधील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवले जातील.
झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ पुढीलप्रमाणेभारतीय संघ: शिखर धवन (कर्णधार) ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर