मुंबई - 2017 मध्ये चौदा मालिकांमध्ये अजिंक्य राहिलेला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहचला आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. यावर्षी घरचं मैदान गाजवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता परदेशात आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करणार आहे. 2018 मध्ये विराट कोहली अँण्ड कंपनी कोणाकोणाविरुद्ध क्रिकेट खेळणार आहेत हे जाणून घ्या...
दक्षिण आफ्रिकेतील वेळापत्रक -
- पहिली कसोटी : 5 ते 9 जानेवारी 2018
- दुसरी कसोटी : 13 ते 17 जानेवारी 2018
- तिसरी कसोटी : 24 ते 28 जानेवारी 2018
वन डे मालिका
- पहिला वन डे सामना : 1 फेब्रुवारी
- दुसरा वन डे सामना : 4 फेब्रुवारी
- तिसरा वन डे सामना : 7 फेब्रुवारी
- चौथा वन डे सामना : 10 फेब्रुवारी
- पाचवा वन डे सामना : 13 फेब्रुवारी
- सहावा वन डे सामना : 16 फेब्रुवारी
टी ट्वेण्टी मालिका
- पहिला टी 20 सामना : 18 फेब्रुवारी
- दुसरा टी 20 सामना : 21 फेब्रुवारी
- तिसरा टी 20 सामना : 24 फेब्रुवारी
8 ते 20 मार्च, निधास चषक, भारत-बांगलादेश-श्रीलंका यांच्यात तिरंगी वन-डे मालिका
इंडियन प्रिमिअऱ लिग - 4 एप्रिल ते 31 मे (अंदाजे तारखा)
भारताचा इंग्लंड दौरा - (3 जुलै ते 11 सप्टेंबर) 3 टी-२०, ३ वन-डे आणि 5 कसोटी सामन्यांची मालिका
- 3 जुलै – पहिला टी-20 सामना, मँचेस्टर
- 6 जुलै – दुसरा टी-२० सामना, कार्डीफ
- 8 जुलै – तिसरा टी-२० सामना, ब्रिस्टॉल
- 12 जुलै – पहिला वन-डे सामना, नॉटिंगहॅम
- 14 जुलै – दुसरा वन-डे सामना, लंडन, लॉर्ड्स
- 17 जुलै – तिसरा वन-डे सामना, लीड्स
- 1 ते 5 ऑगस्ट – पहिला कसोटी सामना – एजबस्टन
- 9 ते 13 ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना – लंडन, लॉर्ड्स
- 18 ते 22 ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना नॉटिंगहॅम
- 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर – चौथा कसोटी सामना – साऊद्म्टन
- 7 ते 11 सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना – लंडन, ओव्हल
- आशिया चषक – 15 ते 30 सप्टेंबर
ही स्पर्धा भारतात होणार असून यात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ सहभागी होणं अपेक्षित आहे. पाकिस्तान संघाच्या सहभागावर अजुन प्रश्नचिन्ह आहे.
- वेस्ट इंडिजचा भारत दौरा - ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2017
आयसीसीने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार, वेस्ट इंडिजचा संघ भारतात 3 कसोटी, 5 वन-डे आणि 1 टी-20 सामना खेळणार आहे. मात्र या दौऱ्याचं वेळापत्रक अजुन जाहीर करण्यात आलेलं नाहीये.
- भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा - 4 कसोटी सामन्यांची मालिका
भारताच्या या दौऱ्याचं वेळापत्रकही अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही, मात्र...नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकतो.