Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ साठी भारताच्या महिला संघाची घोषणा BCCI ने आता केली. भारतीय महिला व पुरुष संघ प्रथमच आशियाई स्पर्धेत खेळणार आहेत. त्यासाठी महिला संघ आज जाहीर करण्यात आला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ स्पर्धेत खेळणार आहे. स्मृती मानधना उप कर्णधार असणार आहे. Asian Games 2023मध्ये ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळवलं जाणार आहे आणि २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा चीनमध्ये पार पडणार आहे. पण क्रिकेटचे सामने १९ ते २८ सप्टेंबरला होतील.
२०१० व २०१४च्या आशियाई स्पर्धेत क्रिकेट खेळलं गेलं, परंतु बीसीसीआयने संघ पाठवणे गरजेचे नाही समजलं. आशियाई स्पर्धा मागच्या वर्षीच होणार होती, परंतु कोरोनामुळे ती पुढे ढकलली गेली. जकार्ता येथे २०१८ साली पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत क्रिकेट बाद करण्यात आले होते. आतापर्यंत दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाला असताना पुरुषांमध्ये एकदा श्रीलंका आणि एकदा बांगलादेशने सुवर्णपदक जिंकले आहे. दुसरीकडे, महिलांमध्ये पाकिस्तानने दोन्ही वेळा विजय मिळवला आहे.
भारतीय महिला संघ - हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती माधना ( उप कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष ( यष्टिरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली शर्वणी, तितास सधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कानिका अहुजा, उमा चेत्री ( यष्टिरक्षक), अनुषा बारेड्डी, राखीव खेळाडू - हर्लीन देओल, काश्वी गौतम, स्नेह राणा, साईका इशाक, पूजा वस्त्राकर ( TEAM - Harmanpreet Kaur (C), Smriti Mandhana (VC), Shafali Verma, Jemimah Rodrigues, Deepti Sharma, Richa Ghosh (wk), Amanjot Kaur, Devika Vaidya, Anjali Sarvani, Titas Sadhu, Rajeshwari Gayakwad, Minnu Mani, Kanika Ahuja, Uma Chetry (wk), Anusha Bareddy Standby list of players: Harleen Deol, Kashvee Gautam, Sneh Rana, Saika Ishaque, Pooja Vastrakar)